Maharashtra

चांप्यात कृषि संजीवनी सप्ताह साजरा

चांप्यात कृषि संजीवनी सप्ताह साजरा

भर पावसात भरली शेतकऱ्यांच्या बांध्यावर शेतकरी कार्यशाळा

चांपा, ता६ : खरीप २०२० या वर्षात उमरेड तालुक्यातील चांपा गावात शेतकरी पुस्कर बुटी यांच्या शेतावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि संजीवनी सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला,

कृषी संजीवनी सप्ताहात उमरेड तालुका कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड तालुक्यात चांपा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बैठक घेण्यात आली यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी मार्गदर्शन करतेवेळी पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करणे, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बाबत जनजागृती केली सोबतच प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना,जमीन आरोग्य पत्रिका वितरण व वाचन,परंपरागत कृषि विकास योजना,केंद्ग व राज्य शासनाच्या कृषि व कृषि संलग्न विभागाच्या शेतकर्यांसाठी असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शन, सोयाबीन व कपाशी पिकावरील अळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन, रुंद सरी वरंभा लागवड,कडधान्य आंतरपिकाबाबत मार्गदर्शन, बहूपीक पध्दतीची प्रसार, एकात्मीक शेती पध्दती संकल्पनेबाबत, हायड्रोफोनिक्स -हिरवा चारा निर्मीती, फळबाग निर्मीती,सोयाबीन, कापसाची लागवड, बी-बियाणे, खते,औषधे खरेदी व वापर करताना घ्यावयाची काळजी, मुलस्थानी जलसंधारण जनजागृती ,आपत्कालीन पीक नियोजन आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले .

उमरेड तालुका कृषी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, कृषि सहाय्यक ज्योती गुंड, कृषि पर्यवेक्षक मार्कन्ड खंडाईत व मंडळ कृषि अधिकारी चंद्रशेखर कोल्हे ,प्रगतशील शेतकरी पुस्कर बुटी ,आदींच्या उपस्थितीत चांपा येथे गावनिहाय बैठकींना उपस्थित होते, सर्व शेतकरी बांधवांनी या सप्ताहाचा लाभ घेतला,

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रुपचंद कडू होते, प्रमुख उपस्थितीत चांप्याचे सरपंच अतिश पवार,आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करुन कृषि संजीवनी सप्ताह पार पडला.

खरीप २०२० या वर्षात उमरेड तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा तालुका कृषी कार्यालयामार्फत गाव निहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. कृषी संजीवनी सप्ताहात कृषी विभाग-जिल्हा परिषद, यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय बैठका घेऊन तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती उमरेड तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button