आदिवासी महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण
महिला गंभीर जखमी आरोपी मोकाट
मनोज गोरे
चंद्रपूर:
तृप्ती मनोज कुलमेथे एक आदिवासी महिला लग्नसमारंभा करिता कंजर मोहल्ला, जलनगर वार्ड येथे गेली होती. ती परिचित व्यक्तीच्या घरी बसली असतांना तिच्यावर सरिका कंजर,नरेश कंजर,अक्षय कंजर,अमन जाट, या सर्वांनी तृपतीला घराबाहेर ओढत काढलं व तिला विवस्त्र करून बेद्दम मारहाण केली व तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला.
त्या हल्ल्यात तृप्तीच्या हातावर, मांडीवर, पाठीवर, चाकूने वार करण्यात आले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. त्या मुख्य आरोपींना अजूनही अटक झाली नसून ते मोकाट फीरात आहे व तृप्तीच्या परिवारातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. सदर आरोपी हे अवैध दारू व्यवसाय करणारे असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे पीडितांच्या परिवारातील भयभीत झाले असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. घटनास्ताळापासून एक हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असून आदिवासी महिला व तिचा परिवार न्याया साठी सातत्याने धावपळ करीत आहे परंतु तिला अजूनही न्याय मिळालेला नाही.
करिता सर्व आरोपींना तात्काळ अटक करू कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन बिरसा क्रांती दलाच्यावतीने पोलीस प्रशासनास दिले आहे.पीडितास उचित न्याय न मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी समाजाच्या सर्व संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा बिरसा क्रांती दलचे जिल्हाध्यक्ष कमलेश आत्राम,नागपूर विभाग प्रमुख डॉ. पंकज कुलसंगे,जिल्हा महासचिव जितेश कुलमेथे,यांनी दिलेला आहे.






