स्वर्गीय दादासाहेब जे टी महाजन यांच्याकडून ग्रामीण भागात सहकार्याची सुरुवात
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : येथील स्व.दादासाहेब जे.टी.महाजन होत. सातपुड्याचे पायथ्याशी असणाऱ्या न्हावी तालुका यावल खेड्यात जन्म घेतलेले दादासाहेब आज आपले कार्यकर्तृत्वामुळे त्यांची किर्ती महाराष्ट्रभर गाजते आहे. स्व.दादासाहेबांचे निधन होवून अनेक वर्षे झाली आहे. समाज |विसरलेला नाही. अशा कर्तव्यनिष्ठ महात्मेचा कार्याचा उजाळा आजच्या नवीन पिढीला व कार्यकर्त्यांना निश्चित प्रेरणादायी ठरेल. दादासाहेबांनी स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते महात्मा गांधी, पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण यांनी नेत्यांचे प्रेरणेने, फैजपूर येथील म्युनिसीपल हायस्कुल मधील माध्यमिक शिक्षकाची नोकरीचा त्याग केला व देशसेवा व समाजसेवेत पुर्णवेळ वाहून घेतले. देशाला स्वातंत्र्य मिळाले. नवीन देश उभारणीचे वारे | देशभरात सुरू झाले. महाराष्ट्रात सहकाराचे माध्यमातून महाराष्ट्र बांधणीचे कार्य स्व.यशवंतराव चव्हाणाचे नेतृत्वाखाली जोमाने सुरू झाले. आणि या झंझावातामध्ये दादासाहेब आपले कार्य रूपाने समपीत झाले. नवसमाज निर्मितीचा ध्यास घेवून प्रथमतः गावामध्ये कार्यास सुरूवात केली. न्हावी गावाचे सरपंच, पं.स.सदस्य यावल पं.स. सभापती आमदार महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री विधानसभा सभापतीचे तालुक्यांवर सभापती, अंदाजपत्रक समितीचे चेअरमन अशी अनेक राजकिय पदांवर दादासाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटविला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांचे मंत्री मंडळात सर्वाधिक खाते दादासाहेबांकडे होते. या माध्यमातून दादासाहेब संपूर्ण महाराष्ट्रात प्रामाणिक व पारदर्शी व संयमी व निष्कलंक नेतृत्व दिले. अनंत समाजहिताचे कार्य केले. या बरोबरच सहकारात सुध्दा गावापासून सुरवात केली. न्हावी गावात फूटसेल सोसायटी, नंतर, मधुकर सहकारी साखर कारखाना, जळगाव जिल्हा दूध संघ, खडका सुतगिरणी, यावल सह. सुतगिरणी असे मोठे प्रकल्प उभारणीस स्व.मधुकरराव चौधरी यांचेही प्रेरणा दादांनी मिळाली.
या मोठे प्रकल्पाची पायाभरणी करून हे प्रकल्प यशस्वी चालविणे, शिक्षण क्षेत्रात सुध्दा दादांनी क्रांती घडवली. धनाजीनाना महाविद्यालयाचे उभारणीत सचिव म्हणून जबाबदारी घेवून तद्नंतर अनेक वर्षे चेअरमन व अध्यक्षपदावर असतांना महाविद्यालयाचा विस्तार केला. अनेक गरीब विद्यार्थी व मुली शिक्षण घेवून विकसीत झाल्या. तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाची स्थापना दादांनी करून सातपुड्याचे पायथ्याशी असणारे ग्रामीण भागात या मंडळाचेवतीने अभियांत्रिकी महाविद्यालयाची उभारणी करून तांत्रिक शिक्षणाची गंगा आणली. हजारो मुले व
मुली या महाविद्यालयातून इंजिनिअर पदवी घेवून जगात पोहचले. हे सर्व केलेले कार्य केवळ देशसेवा व नवसमाज निर्मितीचा ध्यास यासाठी रात्रंदिवस झटले, संपूर्ण आयुष्य समरप्रीत केले. राजकारण समाज कारण करत असतांना दादासाहेबांनी समाजबांधिलकी व आपुलकी आपल्या प्रेमळ स्वभावाने जोपासली. उत्तुंग व्यक्तीमत्व व प्रेमभरीत संबंध जोपासून शेकडो कार्यकर्ते तयार केले. कार्यकर्त्यांचे पाठिशी खंबीरपणाने उभा राहणारा नेता, समाजावर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम करणारा नेता आम्ही अनुभवला या नेतृत्वाचे कार्य, स्मृती आम्ही कायम हृदयात साठविल्या आहे. आजही महाराष्ट्रभर फिरत असतांना दादासाहेबांचा नावाचा उच्चार करतांना महाराष्ट्रातील सर्व पक्षामधील नेते, कार्यकर्ते दादांनी केलेल्या कार्याचा उल्लेख आदराने करतात. समजाच्या हृदयात असलेली आदराची प्रतिमा हिच खर शिल्लक असलेली किर्ती आहे. आजही दादांचे निधनानंतर असलेली कीर्ती ऐकून अनेकांना आठवण येते
स्व.दादासाहेबांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व उपाध्यक्ष पद भुषविले, डेक्कन टेक्नालॉजी असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले. अशा अनेक संस्थांचे माध्यमातून, हजारो युवकांना शिक्षण व रोजगार दिला.दादांनी केलेल्या राज्यभर कार्याच्या त्यांचे पुत्र शरद महाजन हे त्यांच्या पायावर पाऊल ठेवून जिल्हा परिषद ते सहकार क्षेत्रात अत्यंत संयमपणे कार्य करीत आहे वडिलांच्या अशा महत्त्वाच्या कार्यामुळे रावेर यावल तालुक्यातील शरद महाजन यांना विधानसभेवर संधी मिळावी अशीचर्चा नागरिकांमध्ये आईक्याला मिळत आहे






