India

Important: अंगावर काटा येतो म्हणजे नेमकं काय..?

Important: अंगावर काटा येतो म्हणजे नेमकं काय..?

एखादा भयावह प्रसंग पाहताना, ऐकताना, किंवा कोणा एकाला सांगताना, अती थंड वातावरणात असताना अचानकच शरीर शहारतं, अर्थात अंगावर काटा उभा राहिला असं आपण म्हणतो. प्रसंग वेगवेगळे असतात, पण त्यावेळी अंगावर काटा आल्यावर लगेचच आपण त्याकडे इतरांचं लक्ष वेधतो. पण हा काटा येतो म्हणजे नेमकं होतं तरी काय?

अंगावर काटा किंवा शहारे केव्हा येतात हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात.

विचार करा कि तुम्ही कडक उन्हाळ्याच्या दिवशी तलावात पोहत आहात पाणी बर्‍यापैकी उबदार आहे, परंतु वारा जोरदार आहे म्हणून आपण पाण्यातून बाहेर निघून तलावाच्या कडेला उभे राहिले आहेत. येणाऱ्या वाऱ्यामुळे आपणास थंडी वाजत आहे त्याच क्षणी आपणास अंगावर काटा येतो . यानंतर आपण घरी जाता, थंडी घालवण्यासाठी उबदार कपडे घालता आणि गाणी ऐकता आता अचानक, आपण खूप दिवसांपूर्वीचे एक प्रेरणादायी गाणे ऐकले होते तेच गाणे पुन्हा लागले पुन्हा तुमच्या अंगावर काटा आला. पुन्हा, आपल्याला थंडी जाणवते असे का होते याचेच कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अंगावर काटा किंवा शहारे केव्हा येतात?

अंगावर काटा किंवा शहारे खालील प्रसंगामध्ये येतात.

  • आपल्याला अचानक थंडी वाजल्यावर,
  • अचानक भीती वाटल्यावर,
  • किंवा कधीकधी अचानक प्रेरित झाल्यामुळे,आपल्या अंगावर काटा येतो.

अंगावर काटा येण्यामागचे कारण?

अंगावर काटा येणे हि एक शारिरीक घटना आहे जी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून भेटली आहे जी त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त होती परंतु आपल्याला आताच्या काळात त्याचा फार काही उपयोग नाही. आपला प्रत्येक केस हा सूक्ष्म स्नायूंशी जोडलेला असतो, हा स्नायू आकुंचन पावल्यामुळे आपल्या त्वचेवर उथळ खळगे निर्माण करतो त्यामुळे आपणास अंगावर काटा उद्भवतो आणि आकुंचन पावल्यामुळे शरीराला थंडी वाजू लागते व त्यामुळेच शरीरावरील केस उभे राहतात.

  • यामागचं शास्त्रीय कारण .. (Scientific rason behind Goosebumps)

स्ट्रेस हॉर्मोन म्हणजेच ऐड्रेनलिनच्या स्त्रावामुळेही अंगावर काटा उभा राहतो. यामुळं शरीरावर इतरही परिणाम होतात. कारण, सहसा ही प्रक्रिया जास्त थंडी वाजल्यास, भीती वाटल्यास, भावनिक झाल्यास किंवा अती ताण घेतल्या उदभवू शकते.
अंगावर काटा येण्याव्यतिरिक्त काहींना (Sweating) घाम फुटतो, हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो, कित्येकदा रक्तदाबही (Blood Preasure) वाढतो. काही भूतकाळातील प्रसंग आठवूनही अंगावर काटा उभा राहतो. आता याबद्दल इतकी माहिती तर मिळाली, त्यामुळे यापुढे तुम्हाला कोणी म्हटलं की अरे अंग शहारलं… तर यामागचं कारण त्यांना नक्की सांगा.

  • प्राणांच्या अंगावर येणार काटा?

प्राण्यांना केसांचा मोठा थर असतो तो त्यांच्यासाठी इन्सुलेशन सारखे काम करतो. म्हणून अंगावर काटा आला कि केस लगेचच उभे राहतात. परंतु माणसांमध्ये या प्रतिक्रियेचा काहीही उपयोग होत नाही कारण आपल्याकडे केसांचा मोठा असा थर नसतो.

अधिक पहावयाचे झाले तर पुष्कळ प्राण्यांना जेव्हा धोका वाटतो उदाहणार्थ कुत्र्याने मांजरीवर हल्ला करताना मांजराचे केस लगेच उभे राहतात जेणेकरून मांजर हे कुत्र्याला आपले भारदस्त केस दाखवून आपण त्यापेक्षा मोठे दर्शविण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून कुत्रा माघार घेऊन तेथून निघून जावा.

  • कोणत्या परिस्थितीत अंगावर काटे उद्भवतात?

लोकांना बऱ्याच परिस्थितीत अंगावर काटे उद्भवतात जसे कि एकाद्या भावनिक परिस्तितीत, भाषण देताना, राष्ट्रगीत चालू असताना किंवा इकडे रोमँटिक गाणे ऐकत असताना. या सर्व प्रतिक्रियांचे कारण म्हणजे Adrenaline हार्मोन जे तणावाच्या काळात सोडले जाते. प्राण्यांमध्ये हा हार्मोन सोडला जातो जेव्हा त्या प्राण्याचे शरीर थंड पडले असेल किंवा तो प्राणी एखाद्या तणावग्रस्त परिस्थितीचा सामना करत असेल. माणसांमध्ये, जेव्हा आपल्याला थंड किंवा भीती वाटते तेव्हा Adrenaline हार्मोन सोडले जाते, परंतु आपण तणावात असल्यास आणि राग किंवा खळबळ यासारख्या तीव्र भावनांनीसुद्धा हे हार्मोन सोडले जाते.

  • निष्कर्ष

अंगावर काटा येणे हि एक शारिरीक घटना आहे जी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून भेटली आहे जी त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त होती परंतु आपल्याला आताच्या काळात त्याचा फार काही उपयोग नाही. काटा येणे हे केसांच्या फोलिकल्सच्या संकुचिततेमुळे तयार होतात. प्राण्यांच्या जगात हे त्यांना जलद गतीने उबदार होण्यास मदत करतात . धोका असल्यास अशा केसांची स्थिती एखाद्या प्राण्याला शत्रूसमोर मोठे आणि अधिक विशाल दिसण्यास मदत करते. आपल्याला थंड हवामानात किंवा भावनिक परिस्थितीत अंगावर काटा येतो. हे Adrenaline हार्मोन च्या उत्सर्जनाचे परिणाम आहे. माणसांमध्ये थंडी किंवा भीती वाटते तेव्हा Adrenaline हार्मोन सोडले जाते यामुळेच अंगावर काटा उद्भवतो. अंगावर काटा किंवा शहारे येण्याची प्रमुख करणे -आपल्याला अचानक थंडी वाजल्यावर, अचानक भीती वाटल्यावर किंवा कधीकधी अचानक प्रेरित झाल्यामुळे आपल्या अंगावर काटा येतो.

इथून पुढे जर कोणी विचारले कि अंगावर काटा का येतो? तर उत्तर तुम्हाला माहितीच आहे. बरोबर ना!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button