Amalner

कोविडच्या महामारीमुळे उदभवलेल्या परिस्थितीत श्रीमती भानुबेन गोशाळे च्या उदारतेचे उत्तम उदाहरण शैक्षणिक साहित्यचे वाटप

कोविडच्या महामारीमुळे उदभवलेल्या परिस्थितीत श्रीमती भानुबेन गोशाळे च्या उदारतेचे उत्तम उदाहरण शैक्षणिक साहित्यचे वाटप

अमळनेर : कोविडमुळे दोन वेळच्या अन्नासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत असतांना मुलांना शैक्षणिक साहित्यासह दप्तर सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट वाडी वस्तीवर जाऊन वाटलेत. शहरातील ताडेपुरा, शनीपेठ, शांताबाई नगर,मिळचाल परिसरातील न प शाळा येथे श्रीमती भानुबेन गोशाळे च्या सहकार्याने सदर उपक्रम राबविण्यात आला.
कोविड महामारी मुळे उद्भलेल्या लॉक डाउन कालावधीत सामान्य माणसाला मूलभूत बाबींसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.बंद चा परिणाम म्हणून मजुरांच्या हाताला काम नाही. त्यात शैक्षणिक साहित्य, दप्तर खरेदीची कल्पना सामान्य गरीब कुटुंब करू शकत नाही. अश्या स्थितीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक
साहित्य वाटपाचा कार्यक्रम शहरातील मागास वस्ती असलेल्या शांताबाई नगर टेकडी परिसर, ताडेपुरा, शनीपेठ तसेच नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक १० मध्ये आयोजित करण्यात आला होता. सेवाभावी उपक्रमाचे प्रमुख संयोजक प्रा अशोक पवार अध्यक्षस्थानी होते. बन्सीलाल भागवत आणि गौतम मोरे यांनी मुलांना मार्गदर्शन करीत समयोचित भाषण केले.याप्रसंगी नगर पालिका शिक्षण मंडळाचे सुनील पाटील,सत्तार भाया , हमीद गुरुजी,विक्रम पाटील,सुनिल शिंपी,श्रीनाथ पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यतीन पवार,सरस्वती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक रणजित शिंदे,शुभम बोरसे,शिक्षक धर्मा धनगर, परशुराम गांगुर्डे, आदिंनी सहकार्य केले.न पा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती पाटील, शिक्षक रवी पाटील यांनी लॉक डाउन चे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना एकत्र करून साहित्य वाटप करण्यात मोठे परिश्रम घेतले.
श्रीमती भानुबेन शाह गोशाळेचे सचिव चेतनभाई शाह यांच्या माध्यमातून जनकल्याण ग्रुप चे कमलेश भाई,सेवा सौभाग्य ट्रस्ट चे नवणीतभाई गाला,श्री अरीहंत कृपा फौंडेशन चे जुलेश भाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथून शेकडो गरजू विद्यार्थ्यांसाठी दप्तर व शैक्षणिक साहित्य पाठविले होते त्याचे वाटप करण्यात आले.

*न.पा. शाळा न.१० ची दुरुस्ती करा!*

अमळनेर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाची मराठी माध्यम असलेली एकमेव शाळा सध्या अस्तित्वात आहे.शाळेच्या संपूर्ण इमारतीची आणि परिसराची खूप पडझड झालेली आहे.तेथे वर्ग, पाणी वीज,स्वच्छता सुविधा यांचा अभाव असून अमळनेर नागरी हित दक्षता समिती सदर प्रकरणी लक्ष घालून येथील सुधारणांसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे समितीच्या वतीने प्रा अशोक पवार यांनी जाहीर केले.
■■■■■■■■■■■■■

संबंधित लेख

Back to top button