बॉलिवूड चा लग्नाळू सिझन..!आता “ही”अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात..!
मुंबई बॉलिवूड मध्ये सध्या लग्न सराई सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनी लग्न केले. तर नुकतंच कॅटरिना कैफ आणि विकी कौशल विवाह बंधनात अडकले.आलीया आणि रणबीर यांच्या विवाहाची तयारी सुरू आहे.तर नुकताच अंकिता लोखंडे चा साखरपुडा पार पडला आहे. आता बॉलिवूड मधील अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रीच्या पालकांनी म्हणजे मावशीने तिच्या विवाहाचे संकेत दिले आहेत.
एका अभिनेत्रींच्या मावशीने एक सुंदर पोस्ट केली आहे आणि त्यावरून आता लवकरच ती म्हणजेच श्रध्दा कपूर लवकरच लग्न करणार अशी चर्चा रंगली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे या श्रद्धा कपूरच्या मावशी आहेत, हे तर आपल्या सर्वाना ठाऊकच आहे. पद्मिनी कोल्हापुरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामधून लवकरच श्रद्धा कपूर लग्नबेडीत अडकणार असे संकेत मिळत आहेत. श्रद्धा कपूर माघील काही काळापासून प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठला डेट करत असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरु आहे.
दोघे अनेकवेळा एकत्र स्पॉट देखील झाले आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चाना काही महिन्यांपूर्वी चांगेलच उधाण आले होते. आता त्यावरच पद्मिनी कोल्हापुरे यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे लवकरच श्रद्धा लग्न करणार असं अनेकांना वाटतं आहे.
प्रेम रोग या सिनेमामधील ये गलियाँ ये चोबारा हे गाणं नुकतंच पद्मिनी कोल्हापुरे स्वतःचा आवाज देत रिक्रिएट केलं आहे. हे गाणं लाँच होताच श्रद्धा कपूरने आपल्या मावशीचा ट्रॅक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.






