Amalner

वाळू माफियांची मुजोरी वाढली तहसीलदार यांच्या वाहनाला धडक अपघात करण्याचा प्रयत्न

ब्रेकिंग न्यूज

वाळू माफियांची मुजोरी वाढली तहसीलदार यांच्या वाहनाला धडक अपघात करण्याचा प्रयत्न

अमळनेर येथे प्रशासनानाला धुडकावून लावत जोरदार पणे वाळू उपसा अव्याहत पणे सुरू आहे. वाळू माफियांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असल्याने ते कोणालाही घाबरत नाहीत.आता तर तहसीलदार अमळनेर यांच्या गाडी वर रात्री गाडी चढवून अपघात करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सदर घटना खरदे वासरे या दरम्यान पहाटे च्या सुमारास घडली असून ट्रॅकटर ने धडक देण्याचा प्रयत्न केला.

तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार भानुदास शिंदे आणि इतर कर्मचारी पथक घेऊन

तहसीलदार यांचे घेऊन गस्त घालत असताना सदर घटना घडली आहे. ट्रॅकटर चालकास भीमराव वानखेडे यास ताब्यात घेण्यात आले असून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स पो नि राजेंद्र फुला करत आहेत.आरोपी जवळील मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button