Amalner

पारोळ्यातील अत्याचारग्रस्त तरूणीच्या मारेकर्‍यांना फाशी द्या : चर्मकार महासंघ यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन !

पारोळ्यातील अत्याचारग्रस्त तरूणीच्या मारेकर्‍यांना फाशी द्या : चर्मकार महासंघ यांचे मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन !

प्रतिनिधी :


अमळनेर : अमळनेर प्रतिनिधी- पारोळा तालुक्यातील टोळी गावामधील निलीमा सावंत नावाच्या दलित चर्मकार भगीनीवर गावातील 3 नराधमांनी तीच्यावर सामुहीक बलात्कार करुन आळीपाळीने रात्रभर अत्याचार केला व तिला विष देवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला . काल दि . 10/11/2020 रोजी धुळे येथे हिरे मेडिकल कॉलेज मध्ये उपचारा दरम्यान सकाळी 3.00 वा . तिची प्राणज्योत मावळली . आज ती हयात नसली तरी तिने मृत्यु आधी तिने आपले मामा व बहिणीस जबानीत घडलेली घटना सर्व काही कथन केले . त्यांनतर पोलीसांनी त्या नराधमांना अटक केली . दलित चर्मकार परिवारातील कुमारी निलीमा सावंत फक्त 20 वर्ष वयाची होती . ती औषधी घेण्यासाठी बाहेर गेली असता तीला या नराधमांनी पळवून नेले व अमानुश कृत्य करुन अत्याचार केला व अज्ञात स्थळी तिला विष देवून सोडून गेले . आम्ही या पत्राव्दारे विनंती करतो की , असल्या निच व गुंड प्रवृत्तीच्या नराधमांवर कायदयाने फास्टट्रॅक न्यायालयात दावा दाखल करुन त्यांना कठोरातील कठोर शिक्षा दयावी.
झालेल्या अत्याचाराबाबत मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहराध्यक्ष नरेश दामोदर कांबळे व निता नरेश कांबळे नगरसेविका युवा शहराध्यक्ष रवी ठाकरे आणि रवी कांबळे माधराव कार्लेकर योगेश चव्हाण व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button