Amalner

?️अमळनेर कट्टा..पोलखोल…कृ.उ.बा.स भ्रष्टाचार भाग..१..!कृषी उत्पन्न बाजार समितीत भरतोय भ्रष्टाचाराचा “बाजार”..!कर्मचाऱ्यांच्या परस्पर केल्या पदोन्नती..!चौकशी सुरू..!

?️अमळनेर कट्टा..पोलखोल…कृ.उ.बा.स भ्रष्टाचार भाग..१..!कृषी उत्पन्न बाजार समितीत भरतोय भ्रष्टाचाराचा बाजार..! कर्मचाऱ्यांच्या परस्पर केल्या पदोन्नती..!चौकशी सुरू..!

अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तेचा गैर वापर करत प्रशासक
मंडळामार्फत काही अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून वेगवेगळ्या होत
असलेल्या अपहार व व्यापाऱ्यांची पिळवणूक होत असल्याबाबतची तक्रार गुलाबराव पाटील सहा निंबधक अमळनेर यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे. यात विविध तक्रारी असून मुख्य तक्रार कर्मचारी यांचे शोषण होत असून कर्मचारी ची परस्पर पदोन्नती केल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यात १ महिला कर्मचारी व २ पुरुष नामे १) सुनील हिम्मत पाटिल रा. एकलहरे, २) अमोल संजय पाटील रा. हिंगोणे (आमदार साहेब यांचे पुतणे) त्यापैकी अमोल पाटील सोडून दोघांकडून प्रत्येकी काही रक्कम घेऊन पदोन्नती करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमोल पाटिल हे वॉचमन होते. त्यांना डायरेक्ट क्लार्क करण्यात आले. त्यांची सर्व्हिस ४ ते ५ वर्षे पूर्ण झालेली आहे. त्यात ते मागील १ वर्ष ते बडतर्फ होते. नोकरी लागल्या नंतर किमान १२ वर्षांनी हा प्रस्ताव पाठवता येतो. वॉचमन यांची पदोन्नती शिपाई होते डायरेक्ट क्लार्क नाही.अशी तक्रार केली आहे.

या संदर्भात गुलाबराव पाटील सहा निबंधक यांच्या शी भ्रमणध्वनी द्वारे बोलणे केले असता त्यांनी ह्या नियुक्त्या परस्पर झाल्या आहेत.याबाबतीत चौकशी सुरू असून अशासकीय मंडळाने परस्पर प्रस्ताव पाठवले आमच्या विभागाकडून गेलेले नाहीत.परवानगी पत्र घेतले नसून आज चौकशी साठी ग्रेडर गेले आहेत.दोन तीन दिवसांत या संदर्भात खुलासा होईल असे सांगितले आहे.तक्रार अर्जावर अनेकांच्या सह्या आहेत.
श्री. प्रफुल्ल लिलाव पवार.श्री पराग शाम पाटील. सौ किरण हिरालाल पाटल
उज्वला बंडू पाटील, मंगलाबाई किशोर पाटील सी श्रावण प्रकाश पाटील,सी. भगवान कोळी इ च्या तक्रार अर्जावर सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button