Amalner: एस एस पाटील आश्रमशाळेत मकर संक्रांतीनिमित्त अन्नदान..!
अमळनेर:- आबासो एस. एस पाटील आश्रम शाळा,अमळनेर येथे दिपकभाऊ चौघुले व मित्र परिवाराचा वतीने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आज मकर संक्रांतीचे औचित्य साधत अन्नदान करण्यात आले.
राजकीय सामाजिक कार्य करत असताना जाहिरातिवर वायफळ खर्च न करता सणासुदीचा काळात दुर्लक्षित घटका सोबत सण साजरा करण्याचा हेतून आज अन्नदान करण्यात आले. प्रसंगी सामजिक कार्यकर्ते बाळासाहेब संदांनशिव,, महेशभाऊ कासार,भूषणभाऊ चौघुले, राजुभाई काझी संदिपभाऊ चौघुले, बाळाभाऊ चौघुले आदी उपस्थित होते






