अमळनेर शहरी भागातील सुमारे ४० अंगणवाडी कर्मचारी गेल्या एक ते दिड महिन्यापासून कोरोनाचे रूग्ण असलेल्या कंटेंमेंट झोन मध्ये जीवाची पर्वा न करता रोज नियमितपणे होम टू होम जाऊन काम करीत आहेत. असे असतांना
प्रतिनिधी नूर खान
न.पा.आरोग्य विभागाने या महिला कर्मचाऱ्यांना सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरीकांचे स्क्रिनींग करण्याचे काम दिल्यामुळे रात्री उशिरापर्यंत एकट्यांना घरी जावे लागते.त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सायंकाळचे आम्हाला देऊ नये तसेच थर्मल गण सदोष दिल्याने त्या अधूनमधून बंद पडत आहेत. त्यामुळे काम सोडून थर्मल गण साठी पदोपदी न.पा.दवाखान्यात बोलवू नये. यासह सँनिटायझर,मास्क आदी साहित्य देण्यात यावे आणि न.पा. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांपासून होणारा त्रास बंद करण्यात यावा.सकाळी ७ वाजेपासून न.पा.दवाखान्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी असहकार पुकारत ठिय्या दिला.परंतु न.पा.आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव श्री. विजयसिंग परदेशी यांनी दखल घेत अमळनेर गाठले.आणि आरोग्य अधिकारी डॉ.विलास महाजन यांना पाचारण करून सविस्तर चर्चा केली. सदर चर्चेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सायंकाळचे काम दिले जाणार नाही तसेच कोरोनाचे काम आळीपाळीने दिले जाईल.याबाबत आज सायंकाळ पर्यंत नियोजन करण्यात येईल तसेच कोरोनाचे काम करतांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जाईल तसेच झाल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले.चर्चा करण्यासाठी अमळनेरचे बालविकास प्रकल्प अधिकारी,श्री. बी.बी.वारूळकर आणि संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी मध्यस्थी केली.






