Amalner: क्षुल्लक कारणावरून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या..!
अमळनेर शहरातील शिरूड नाका परिसरातील एका तरुणीने शुल्लक कारणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मिळालेली माहितीनुसार शिरूड नाका परिसरात राहाणाऱ्या २० वर्षीय मानसी भास्कर माळी ही विद्यार्थिनी प्रताप महाविद्यालयात बी.कॉम च्या दुसऱ्या वर्षाला होती. पण तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला नाही. म्हणून तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना दि १० रोजी सायंकाळी घडली आहे.सदर बाबतीत आकस्मिक मृत्यूची नोंद करणयात आली असून पुढील तपास सुरू आहे.






