नारायणगाव खेरवाङी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:निफाड तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी येथे जिल्हा परिषद शाळा व ग्रामपालिका च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती रत्नाताई संगमनेरे या होत्या यावेळी रत्नाताई यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व शाळेच्या व गाव च्या वतीने नवनिर्वाचित सभापती रत्नाताई यांचा सत्कार करण्यात आला गावचा इतिहासात प्रथमच सदस्य व सभापतीपद मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचे आनंदी वातावरण दिसून येत होते यावेळी रत्नाताई यांनी मनोगत व्यक्त करताना आपण तालुक्याच्या व गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बाळासाहेब काठे शिक्षक वर्ग शालेय शिक्षण समिती अध्यक्ष उमेश भाऊ पगारे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास उपस्थित गावचे तलाठी शशिकांत चितळकर ग्रामसेवक दहिफळे स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सुभाष आवारे ज्येष्ठ नेते सतीश संगमनेरे शंकर संगमनेरे माजी सरपंच सोपान संगमनेरे पत्रकार विजय केदारे राजेंद्र अहिरे अंगणवाडी सेविका आशा सेविका आदी ग्रामस्थ उपस्थित होते.






