Maharashtra

ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील- आमदार शिरीष चौधरी

ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील आमदार शिरीष चौधरी
आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते भव्य सावता स्मारकाचे भूमिपूजन व विविध विकास कामांचे लोकार्पण उत्साहात

ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील- आमदार शिरीष चौधरी

अमळनेर प्रतिनिधी – गेल्या साडेचार वर्षांपासून अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून ग्रामीण व शहरी भागातील अनेक समस्या मी सोडल्या असून सर्वात जास्त निधी तालुक्यासाठी खेचून आणला आहे. आज देवगाव देवळी गावांमध्ये  शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारकाचे भूमिपूजन माझ्या हातून होत आहे याचा मला आनंद  आहे. पण अमळनेर तालुक्याच्या जनतेची मला भक्कम साथ असल्यामुळे पुढच्या वेळेस मी याचे उद्घाटन सुद्धा करेल याची मला पूर्ण शाश्वती आहे असे सूचक उदगार देवगाव देवळी येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे व विकास कामाचे भूमिपूजन करताना आमदार शिरीष चौधरी बोलत होते
    यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. माळी समाज महासंघाचे संघटक
 प्रविण महाजन म्हणाले की तालुक्यातील देवळी येथील संत सावता महाराज-फुले दाम्पत्य यांचे भव्य स्मारक समाजाला,युवकांना प्रेरणा देणारे आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी देशाला मोठी ऊर्जा दिली असून युवकांनी त्यांचा विचारांचा प्रसार करावा असे सांगितले. येथील संत सावता महाराज,फुले दाम्पत्य यांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी बोलत होते.
   यावेळी संत सावता माळी, फुले दाम्पत्य भव्य स्मारक,आशापुरी माता मंदिर सभागृह,देवमढी भूमिपूजन व सामाजिक सभागृह कामांचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती देवळी येथील सरपंच अशोक माळी, माजी सरपंच नवल पाटील,धर्मराज माळी, उपसरपंच अनिल पाटील,न.पा. गटनेते प्रवीण पाठक, बाळू पाटील,माजी नगरसेवक ऍड- सुरेश सोनवणे,किरण गोसावी,माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन,बाळू पाटील,बबलू पाटील,कैलास पाटील,शिवाजी महाजन,गोपाल माळी, सचिन माळी,श्रीकृष्ण माळी,महात्मा फुले विचारमंच,महाराष्ट्र माळी समाज महासंघ पदाधिकारी,शाखा प्रमुख कार्येकर्ते तसेच देवळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्येक्रमाचे सूत्र संचालन शरद खैरनार यांनी तर आभार शिवाजी महाजन यांनी केले
क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या तर्फे भव्य स्मारकाची मागणी करण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button