Maharashtra

तरवाडे ग्रामपंचायत मधील गैरभ्रष्टाचाराची चौकशी करा.

तरवाडे ग्रामपंचायत मधील गैरभ्रष्टाचाराची चौकशी करा.
 छावा संघटनेचे प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांना निवेदन.

तरवाडे ग्रामपंचायत मधील गैरभ्रष्टाचाराची चौकशी करा.

अमळनेर प्रतिनिधी-
वरील विषयानुसार मौजे तळवाडे ग्रामपंचायत मधील सन-२०१६-१७ , २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२०मधील ग्रामपंचायतच्या आर्थिक वर्षामध्ये मौजे तळवाडे येथील सरपंच रामकृष्ण अभिमान पाटील व पत्नी वंदना रामकृष्णा पाटील यांनी मौजे तळवाडे ग्रामपंचायत मध्ये दलित वस्ती सुधारणा निधी, विहीर गाळ, नवीन विहीर खोदाई व १४ वे वित्त आयोग, शौचालय इ. मध्ये १२ ते १५ लाख रुपयाचा भ्रष्टाचार मौजे तळवाडे ग्रामपंचायतने केलेलाआहे. उपरोक्त उल्लेखित ३ वर्षापासून झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची कसून चौकशी होण्यासाठी जिल्हा स्तरीय समिती नेमून त्या चौकशी अंतर्गत मौजे तळवाडे ग्रामपंचायत मध्ये झालेला भ्रष्टाचार संदर्भात संबंधितांवर व सरपंचवर फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करावा. व झालेल्या भ्रष्टाचाराची सबंधितांकडून भरपाई करावी,
 निवेदन अंतर्गत व विनंतीनुसार भ्रष्टाचाराची चौकशी व मौजे तळवाडे ग्रामपंचायतची चौकशी साठी ३० जुलै
पर्यंत जिल्हा स्तरीय समिती नेमावी, १५ दिवसात जिल्हा स्तरीय चौकशी समिती नेमली नाही तर छावा जनक्रांती
संघटना महाराष्ट्र राज्यतर्फ ९ ऑगस्ट २०१९ (क्रांती दिवस) पासून आमरण उपोषण विभागीय आयुक्त कार्यालय,
नाशिक (महसूल आयुक्त नाशिक) यांचा गेट जवळ आमरण उपोषण करण्यात येईल, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र
पदाधिकारी व मौजे तळवाडे ग्रामस्थ इंजी. शरद पवार ,अॅड. अलका शेळके 
(छावा जनक्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष) (छावा जनक्रांती संघटना महासचिव तथा कायदेशीर सल्लगार पूजा सतीश मोरे ,
(छावा जनक्रांती संघटना महिला जिल्हाध्यक्ष, नाशिक)ग्रामस्थ तळवाडे ग्रामपंचायत, कमलाकर ईश्वर पाटील, ,किशोर चंद्रकांत पाटील, नितीन उखा पाटील  , विनोद सुखदेव पाटील यांनी केले आहे. 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button