Maharashtra

बांधकाम कामगार मोफत आरोग्य तपासणी व सुरक्षा किट वाटप शिबिराचे आयोजन

बांधकाम कामगार मोफत आरोग्य तपासणी व सुरक्षा किट वाटप शिबिराचे आयोजन

बांधकाम कामगार मोफत आरोग्य तपासणी व सुरक्षा किट वाटप शिबिराचे आयोजन

चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
तालुक्यातील बांधकाम कामगार बांधवांसाठी अटल बांधकाम कामगार मोफत आरोग्य तपासणी व सुरक्षा किट वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व सन्माननीय खासदार श्री.उन्मेषदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत राबविण्यात आलेल्या बांधकाम कामगार मोफत नोंदणी योजनेअंतर्गत मोफत नोंदणी करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी व सुरक्षा किट वाटपाचे आयोजन आज करण्यात आले होते यावेळी ओझर,तरवाडे,अंधारी व परिसरातील बांधकाम कामगारांची नोंदणी पुस्तके,सुरक्षा किट वाटप व आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी आलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या चेहऱ्यावर आंनद व समाधान दिसून येत होते.सर्व लाभार्थी खासदार उन्मेषदादा पाटील यांना धन्यवाद देत होते.खरे म्हणजे हे यशस्वी शासकीय योजनांच्या जत्रेचे फलित होय.*
    *यावेळी उमंग महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदा उन्मेश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील,श्री.दिनेशभाऊ बोरसे ग्राहक संघटनेचे रमेश सोनवणे , सुनील पाटील व मान्यवरांच्या हस्ते सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले. खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या दूरदृष्टीतून मतदारसंघातील प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत सतत प्रयत्नशील असून मतदारसंघातील प्रत्येक घटक हा परिवाराचाच एक भाग आहे. अशी भावना संपदा पाटील यांनी व्यक्त केली.*
*Bharatiya Janata Party (BJP)*
*BJP Maharashtra*
*Devendra Fadnavis*
*BJP Maharashtra* *labour labourrights शिबिर*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button