Chopda

कोरोना योद्धा म्हणून एस .बी. पाटील यांचा सूतगिरणी तर्फे गौरव

कोरोना योद्धा म्हणून एस .बी. पाटील यांचा सूतगिरणी तर्फे गौरवलतीश जैनचोपडा -चोपडा सूतगिरणीच्या दि . आठ सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत सूतगिरणीचे अभ्यासू संचालक तथा शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य एस. बी . पाटील यांचा तापी सहकारी सूतगिरणीच्या वतीने तथा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. श्री एस. बी. पाटील यांनी कोरोना महामारी विरोधात कोविड सेंटर ऊभारणे, त्यात ऑक्सिजन पुरविणे यापासून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जनजागृती करून जनसेवेच्या माध्यमातून शासनाला मदत करण्याचे भरीव काम केले. ज्याचा आदर्श ईतर जिल्ह्य़ांनी घेतला. स्वताचा जीव धोक्यात घालून एस. बी. पाटील यांनी कोरोना ग्रसित लोकांना आधार देण्याचे महान कार्य केले आहे. ते खऱ्या अर्थाने योद्धा असल्याचे प्रतिपादन संचालक के. डी. चौधरी म्हणाले. त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला. संस्थेचे चेअरमन मा . आमदार श्री कैलास गोरख पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री पी . बी. पाटील, संचालक सर्वश्री माधवराव ऊत्तमराव पाटील, भागवत शंकरराव पाटील, तुकाराम राजधर पाटील, रामदास एकनाथ चौधरी, प्रकाश पंडित रजाळे ,राजेंद्र भास्करराव पाटील, सौ. जागृती संजय बोरसे, सौ. रंजना श्रीकांत नेवे , जनरल मॅनेजर विजय पाटील, अकाउंटंट सुकुमार काळे व सूतगिरणीचा स्टाफ ऊपसथित होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button