India

Bappa Visarjan: बाप्पा निघाले … जाताना मानवाला थोडे शहाणपण देऊन जा

Bappa Visarjan: बाप्पा निघाले … जाताना मानवाला थोडे शहाणपण देऊन जा

#ठळक_मुद्दे

०१) बाप्पा आहेस तू ना तू मग जाताना नदी नाले आणि
समुद्र किनारी पडलेल्या तुझ्या मुर्त्या घेऊन जा….
०२) बाप्पा जाताना थोडं प्रदूषण कमी करता आलं तर
करून जा…
०३) बाप्पा जातांना महिलांचा आदर शिकवून जा…
०४) बाप्पा जाताना जरा दुष्काळी भागातील दुष्काळ घेऊन
जा …
०५) बाप्पा जाताना जरा मानवाच्या मनात मानवा बद्दल
माणुसकी देता आली तर देऊन जा…
०५) बाप्पा तू आहेस ना मग आदिवासी बालकांचे आणि
महिलांचे कुपोषण थांबवून जा…
०६) तरुणांना वेळ, श्रम, पैसा याचं महत्व पटवून जा…
०७) निसर्गपूजा, निसर्ग जपण्याचा मंत्र देऊन जा…
०८) आहेस ना तू मग राजकीय, प्रशासकीय अवयवस्था
आणि भ्रष्टाचार थांबवून जा…
०९) गरीब, दलित, आदिवासींवरील, महिलांवरील अत्याचार
थांबऊन जा….
१०) नाहीच सांगून गेलास तर येशीलच तू पुन्हा पुढच्या वर्षी
मग आहेच ये रे माझ्या मागल्या ????

#संपादकीय….
प्रा जयश्री दाभाडे-साळुंके
नेहमीची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे गणेशजी आले.. दहा दिवस राहिले आणि चालले परत … पुढच्या वर्षी ही ते येतील दहा दिवस राहतील आणि जातील. पुन्हा नद्या, नाले, समुद्र किनारे यावर बाप्पाच्या मुर्त्या पडतील, सडतील, त्यांची विटंबना तर होईलच पण जल प्रदूषण, हवा प्रदूषण, आवाज प्रदूषण ही होईल. कधी संपणार हे सगळं…. दर वर्षी गणपती बाप्पा येतात दर वर्षी वाटतं आता थोडा सामान्य जनतेच्या विचार सरणीत बदल होईल पण नाही दर वेळी वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरण नुकसान होत आहे. जशी आधुनिकता वाढते आहे तसे बापाचे आगमन आधुनिक होत नाही मोठं मोठ्या मुर्त्या,dj, अपारंपरिक रीती रिवाजांची भर दर वर्षी पडत जाते . तरुण मुले, विद्यार्थी आपला बहुमोल वेळ, पैसे, श्रम या दहा दिवसांत फुकट घालवितात.नाच, गाणे, दारू पिऊन अश्लील गाणी वाजवून नृत्य
करणे खरंच बाप्पाला आवडत असेल का? त्याला दर वेळी अपमानित होताना काय वाटतं असेल? दर वेळी अर्धाच बुडताना काय वाटत असेल?दर्शनाला आलेल्या आया बहिणींना धक्के मारत बाहेर काढताना पाहून बाप्पा तुला यातना झाल्या का रे?जातोच आहेस मग हे बलात्कार, महिलांवेरील अत्याचार, सीमेवरील प्रसजन, भूक, उपासमार, कुपोषण, हे का थांबऊ शकत नाहीस गरीब माणसाला निवारा, अंग भर वस्त्र, हे का देऊ शकत नाहीस. का हे जल प्रदूषण वायू प्रदूषण होऊ देतोस. असशील तू तर जाताना जरा या तरुण पिढीला वेळेचं, श्रमच महत्व समजवून जा… जरा नीती मूल्याच्या गोष्टी समजावून जा… मला पूजण्या साठी मोठ्या मूर्ती, पूजा अर्चा,गाणे बजावणे याची गरज नाही सांगून जा …मनात श्रद्धा आणि भाव असेल आणि माणसाने माणसाला जरी माणूस म्हणून ओळखले तरी माझी पूजा होते हे समजावून जा..
स्त्री चा मान सन्मान कसा ठेवावा हे सांगून जा…थोबाड पुस्तक (facebook) आणि काय चालू झुंड (whattsaap )वर फोटो टाकून, तुझ्या सोबत सेल्फी काढून तुझी पूजा होत नाही हे समजून जा….

बाप्पा जाता जाता जरा लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी केली तो हेतू समजावून जा… बाप्पा तुला बुद्धी ची देवता असे म्हटले जाते जरा या मानवाच्या मेंदूत शक्य झाल्यास थोडी बुद्धी देता आली तर देऊन जा … हे समजावून सांगून जा की दगडाच्या प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती पूजन न करता निसर्गाला जपा… आज तुझ्या शेकडो मुर्त्या नद्या, नाले, तलाव, समुद्र किनाऱ्यावर पडल्या आहेत कुठे गेली ती धार्मिकता, तो भाव ज्या भावनेने तुला
स्थापित केले होते तो भाव समजावून जा ….बाप्पा तू येशील का जेंव्हा नैसर्गिक आपत्ती येते…. पूर येतो, भूकम्प येतो, दुष्काळ पडतो…. आमच्या उत्तर महाराष्ट्रात त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ नेहमी असतो शेतकरी राजाला दुष्काळाशी सामना करण्याचं बळ देऊन जा…
होय बाप्पा जाताना मानवाला थोडी बुद्धी देऊन जा…©

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button