फैजपूरच्या जलशुद्धीकनावर आंघोळी करण्यास गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांवर पोलिसात गुन्हा दाखल
फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल
दि. 2 सप्टेंबर 2022 रोजी फैजपुर नगरपरिषद फैजपुर यांच्या खिरोदा ते फैजपुर रस्त्यावर असणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पात दोन ते तीन अज्ञात इसमांनी अंघोळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्या अनुषंगाने फैजपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून आज दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमूद प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ गोपनीय बातमीदार मार्फत माहिती घेतली असता, सदर प्रकार हा तीन यांनी दिली अल्पवयीन मुलांनी केलेला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत.
अशी माहिती फैजपूर चे सहा. पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिली






