Maharashtra

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक…

प्रतिनिधी जितेंद्र गायकवाड

बैठकीत मुक्ताईनगरात शहर रविवार , सोमवार व मंगळवार असे तीन दिवस कडकडीत बंदसह जनता कर्फ्यु चा निर्णय …

मुक्ताईनगर,दि.3,:-शहरात गुरुवारी दहा जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदारांच्या दालनात महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. शहरातील परिस्थितीचा आढावा घेत या संकटावर मात करणे करीता काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली. प्रसंगी तहसिलदार शाम वाडकर, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, नगराध्यक्ष नजमा तडवी, तालुका वैद्यकीय अधीक्षक योगेश राणे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, अफसर खान, गोपाळ सोनवणे, जाफर अली, शकील सर, राजेंद्र हिवराळे, दीपक पवार, वसंता भलभले, प्रफुल्ल पाटील, शुभम शर्मा, स्वीय सहायक प्रवीण चौधरी व संतोष कोळी, उपस्थित होते.

मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आज दहा रुग्णांचे अहवाल पाॅझीटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असल्याने आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाची तात्काळ आढावा बैठक घेण्यात आली. यात वाढत असलेल्या रुग्णांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व काही निर्णय घेण्यात आले. शहरातील शीट फार्म एरिया पूर्णपणे सील करण्यात यावा.तसेच याठिकाणी असलेल्या दाट वस्तीतील प्रत्येक नागरिकांचा परिसरात सर्वे करून स्वॅब घेण्यात यावे, तसेच दोन दिवसानंतर रविवार ,सोमवार व मंगळवार असे तीन दिवस कळकळीचा जनता कर्फ्यू म्हणून तीन दिवस गाव बंद ठेवावे. शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वतःची व परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे. अशी ही जनजागृती प्रत्येक नागरिकाने करावी, कोरोना सेंटर विषयी असलेल्या नागरिकांच्या तक्रारी ही यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोविड सेंटर संबंधी समस्या जाणून घेतल्या. त्याप्रमाणे अत्याधुनिक आयसोलेशन कक्ष येत्या आठ दिवसात उभारणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या आढावा बैठकीत सांगितले त्यात 50 बेडच्या वाढीव कक्षासह दहा बेडचा आयसोलेशन कक्ष तसेच या कक्षा करीता लागणारी अत्याधुनिक सामुग्री जसे व्हेंटीलेटर, डिजिटल एक्स-रे मशीन अशा सुविधा येत्या आठ दिवसात अत्याधुनिक साधनसामुग्री सह आयसीयु कक्ष उभारण्यात येणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button