Bollywood

Bollywood: काय आहे जितेंद्र यांच्या पांढऱ्या कपड्यांचे रहस्य..!

Bollywood: काय आहे जितेंद्र यांच्या पांढऱ्या कपड्यांचे रहस्य..!

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेते जितेंद्र यांना जंपिंग जॅक या नावानं ओळखलं जातं. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.60 ते 70 च्या दशकात जितेंद्र यांच्या नावाची आणि त्यांच्या स्टाईलचीच चर्चा होती. 7 एप्रिलला जिंतेद्र 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. विशेष म्हणजे या वयातही ते फिट आहेत. तरुण पोरांना लाजवेल अशी त्यांच्या शरीराची ठेवण आहे. जितेंद्र फिट राहण्यासाठी वर्कआऊट करताना दिसतात. जिंतेद्र यांच्या पांढऱ्या कपड्याचं एक खास कनेक्शन आहे. त्यांच्या बर्थडेनिमित्त आपण याबद्दलचं जाणून घेणार आहे.

‘जितेंद्र’ नेहमी फिट दिसण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात. सर्वांना प्रश्न पडला असेल की पांढऱ्या रंगाच्या कपड्याचा आणि फिटनेसचं काय खास कनेक्शन आहे..? जितेंद्र यांनी खूप वर्षापूर्वी अभिनयाला रामराम ठोकला आहे. मात्र जेव्हा जेव्हा ते एकाद्या कार्यक्रमात हजेरी लावतात तेव्हा हलक्या रंगाच्या पांढऱ्या कपड्यात दिसतात. एवढेच नाही तर पायातील बूट, चप्पल देखील पांढऱ्या रंगाचेच घालतात. पांढऱ्या रंगाच्या चप्पलचा ट्रेंड खऱ्या अर्थाने कोणी सेट केला असेल तर तो जितेंद्र यांनीच.

जितेंद्र यांनी रिअल लाईफप्रमाणे सिनेमात देखील पांढऱ्या रंगाचेच कपडे घातले आहेत. आज देखील ते तीच स्टाईल फॉलो करताना दिसतात. अशावेळी वारंवार त्यांना पांढऱ्या कपड्यात पाहून सर्वांना प्रश्न पडतो की, जितेंद्र पांढरे कपडे का घालतात. 2021 मध्ये जितेंद्र यांनी इंडियन ऑयडलच्या मंचावर सांगितलं होतं की, जेव्हा मी बॉलिवूडमध्ये काम करायला सुरूवात केली तेव्हा बॉलिवूडमध्ये कोण फॅशन डिडाईनर नव्हता. तेव्हा कलाकर जसे मिळतील कपडे तसे घालत होते.

जितेंद्र यांनी यावेळी सांगितलं होतं की, त्यांनी पांढरी कपडे घालण्यास सुरूवात केली कारण मला कोणी तरी सांगितलं होतं की, पाढंऱ्या कपड्यात आपण फिट दिसतो. रंगीत कपड्यात आपण लहान तर हलक्या रंगाच्या कपड्यात आपली उंची जास्त दिसते. त्यामुळतं मी हलक्या रंगाचे कपडे घालायचो. त्यामुळेच मला पांढऱ्या रंगाचे कपडे जास्त आवडायचे. तेव्हापासून ते आजपर्यंत मी पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यास सुरूवात केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button