एनपुर येथे पवित्र गोडभाताची पंगत देणाऱ्या कुटूंबावर चुल रत्यात लावल्याच्या कारणावरून एका गटाकडून भ्याडहल्ला!
“रस्त्यावर चुल लावण्याच्या शुल्लक कारणावरून थेट कायदा हातात घेऊन एका कुटुंबातील महिला पुरुषांवर विटा, लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉडने, सामूहिक रित्या भयाड व अत्यंत निर्दयीपणे प्राणघातक हल्ला करणारे शेख रशीद शेख अजीज यांच्या गटातील व्यक्तीने महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे गैर कृत्यसह अश्लिल शिव्या देत,तलवारीने कापून टाकेल व पेट्रोल टाकून संपूर्ण घर जाळून देण्याची उघड धमकी देऊन दहशत माजवणारा तो माथेफिरू कोण?” याकडे पोलिसांनी जातीने लक्ष घालून व त्याचा शोध घेऊन त्यावर कठोरात कठोर कारवाई करावी.
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या निंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ऐनपुर येथे गोडभात शिजवण्यासाठी रस्त्यात चुल लावण्याच्या शुल्लक कारणावरून एका कुटुंबातील महिला पुरुषांवर एका गटाकडून भ्याड हल्ला करण्यात आला. हल्ल्या दरम्यान दगड,विटा,लोखंडी राळसह लाठ्या काठ्यांचा सर्रास वापर करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त अशी की, ऐनपूर येथील हैदर अली सैय्यद अली यांच्याकडे धार्मिक प्रोग्राम निमित्त पवित्र गोड भाताचे आयोजन केले असता शेजारी राहणारे शेख रशीद शेख अजीज यांनी रस्त्यात स्वयंपाकासाठी चुल लावण्याच्या कारणावरून वरील इसमा सोबत वाद घातल्याने हा विषय निंभोरा पोलीस स्टेशन पर्यंत दि.११/१२/२०२१ रोजी पोहोचल्याने कदाचित या गोष्टीची चीड निर्माण होऊन शेख रशीद शेख अजीज या इसमाने अशा शुल्लक कारणावरून सामूहिक रित्या हैदर अली सैय्यद अली व त्यांचे कुटुंबसह नातेवाईकांवर अत्यंत निर्दयपणे प्राणघातक हल्ला केल्याने हल्ल्यातील जखमी महिला व पुरुष उपचारार्थ जळगांव येथे दवाखान्यात दाखल आहे.याबाबत निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये हैदर अली सैय्यद अली यांनी फिर्याद दाखल केली असता हल्लेखोर शेख रशीद शेख अजीज, भुरी बी शेख रशीद, शेख छोटू शेख अजीज, शेख असलम शेख अजीज, हमीद अजीज, फरीद अजीज, युसुफ शेख सांडू, आयशा बी शेख युसुफ, अमजद युसुफ, शेख सलीम शेख यअब्दुल, वगैरे १९ व्यक्तींवर गुरनं.१६५/२०२१ भांदवीचे कलम ३२४,३२६,१४३,१४९,३२३,५०४,५०६,१४७, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय काशिनाथ कोळंबे हवलदार विकास कोल्हे ज्ञानेश्वर चौधरी नितीन पाटील स्वप्नील पाटील हे करीत आहे.






