Maharashtra

Health : इंस्टा.. सोशल मीडियावर रील बघत तासन् तास निघून जातात..! कळतच नाही..! तर मग हा आहे ब्रेन रॉट…काय आहे ब्रेन रॉट…जाणून घ्या दुष्परिणाम

Health: इंस्टा.. सोशल मीडियावर रील बघत तासन् तास निघून जातात..! कळतच नाही..! तर मग हा आहे ब्रेन रॉट… काय आहे ब्रेन रॉट….

इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबवर रील्स पाहत नाहीत, अशी माणसं आता शोधून सापडायची नाहीत! ही काही अतिशोयक्ती नाही, वास्तव आहे. आपल्यापैकी अनेकजण तासन् तास स्क्रीनला चिकटून असतात.

रील्स पाहण्यात किती वेळ निघून गेलाय, हे आपल्याला लक्षातच येत नाही. मीम्स, रिल्स बघण्यात आपण इतके गुंग होतो की अनेक गोष्टींचा त्यापुढे विसर पडतो. पण हे असं का होतं? याला एका शब्दात मांडायचं झाल्यास कसं मांडता येईल?

इंग्रजीतील प्रतिष्ठित ऑक्सफर्ड प्रेस डिक्शनरीमध्ये यासाठी एक शब्द दिला गेलाय. ‘ब्रेन रॉट’ (Brain Rot) असा हा शब्द आहे.

ब्रेन रॉट म्हणजे काय, या शब्दाची निवड का केली गेली, असं सगळं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

‘ब्रेन रॉट’ म्हणजे, अशी सवय, ज्यात सोशल मीडियावरील निरुपयोगी ऑनलाईन साहित्य पाहण्याची सवय जडते. स्क्रीनवर निरुपयोगी वस्तू पाहताना तासन् तास निघून जातात. 2023 ते 2024 दरम्यान या शब्दाचा वापर 230 टक्क्यांनी वाढला आहे. मानसशास्त्रज्ञ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अँड्र्यू प्रझिबिल्स्की म्हणतात, या शब्दाची लोकप्रियता आपल्याला ‘जीवनातील वेळेचे महत्व दर्शवते.’

ब्रेन रॉट म्हणजे मेंदू चे सडणे किंवा मेंदूची निष्क्रियता होय.

शॉर्टलिस्टेड शब्दांमध्ये ‘डिम्योर’ (demure), ‘रोमँटेंसी’ (romantansy) आणि ‘डायनॅमिक प्रायसिंग’ (dynamic pricing) यांचा समावेश होता.ब्रेन रॉटप्रमाणे चर्चेत असलेले इतर शब्द ब्रेन रॉटव्यतिरिक्त ऑक्सफर्ड डिक्शनरीतील पाच शब्द शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत.

डिम्योर : सौम्य, संयमित – अशी व्यक्ती जो दिखावा करत नाही किंवा त्याचा व्यवहार अगदी संयमित आहे.

डायनॅमिक प्राइसिंग : एखादी वस्तू किंवा सेवेचा बाजारातील बदलत्या स्थितीनुसार किंमतीत होणारा बदल

लोर : एखादी व्यक्ती किंवा विषयाशी संबंधित तथ्य, त्याची पार्श्वभूमी काय, कथांचं संग्रह, ज्याच्याशी संबंधित प्रश्न तपशीलवार माहितीसाठी किंवा चर्चेसाठी आवश्यक मानले जातात.

रोमँटिसिझम : काल्पनिक कथांचा एक प्रकार ज्याच्या माध्यमातून प्रणय आणि कल्पनारम्य विषय कथांच्या माध्यमातून मांडला जातो. यात विशेषत: जादू, अलौकिक आणि साहसी कथांचा समावेश असतो, परंतु त्याचं केंद्रात रोमँटिक कथा असते.

स्लोप : कला, लेखन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तयार केलेली अशी गोष्ट, जी विवेकाशिवाय ऑनलाईन शेअर केली आहे, ज्यामध्ये सिद्ध न झालेल्या किंवा निरुपयोगी गोष्टींचा समावेश आहे.

केंब्रिज विद्यापीठाने कोणता शब्द निवडलाय?
अशाप्रकारच्या शब्दांची घोषणा करणारी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही एकमेव नाही. तर, गेल्या महिन्यात केंब्रिज विद्यापीठाने ‘मॅनिफेस्ट’ हा शब्द जाहीर केला होता.

पारंपरिकरित्या मॅनिफेस्ट हा शब्द विशेषण म्हणून वापरला जात असेल, तर त्याचा अर्थ स्पष्ट असा होतो. याची व्याख्या करायची झाल्यास असा शब्द जो ‘चिन्हं किंवा कृतींद्वारे काहीतरी स्पष्टपणे दर्शवते’ असा होतो.

यात आता ‘टू मॅनिफेस्ट’ हा शब्दही सहभागी झालाय.

‘टू मॅनिफेस्ट’ म्हणजे आपणाला जे साध्य करायचंय त्यासाठीचा दृढसंकल्प आणि इच्छाशक्ती बाळगणं. कॉलिन्स इंग्लिश डिक्शनरीने नोव्हेंबरमध्ये ब्रॅट हा शब्द वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला.

यासोबतच ‘डिम्योर’ या शब्दालाही इंटरनेट ट्रेंड डिक्शनरी डॉट कॉमने ‘वर्ड ऑफ द इयर’ घोषित केलंय.
मनाला अर्थपूर्ण काहीही मिळत नसल्याने याची परिणती ‘ब्रेन रॉट’मध्ये होते. मोबाइलवर सततचे स्क्रोलिंग करणे, सामाजिक माध्यमांची चटक लागणे, रिवॉर्ड, नोटिफिकेशन्स आणि तत्सन ऑनलाइन बाबींमुळे मेंदू अधिक अलर्ट मोडवर राहतो.

‘मेंदू सडणे’ या शब्दप्रयोगाला नकारात्मक किनार आहे. एखाद्याचे विचार अगदीच निरर्थक, निरुपयोगी आणि नकारात्मक असतील, तर साधारणतः हा शब्दप्रयोग कुत्सितपणे वापरला जातो. मात्र, बदलत्या डिजिटल काळात ‘मेंदू सडणे’ अर्थात ‘ब्रेन रॉट’ या शब्दाला आता वेगळे परिमाण प्राप्त होणार आहे. ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने ‘ब्रेन रॉट’ हा शब्द ‘वर्षातील शब्द’ (वर्ड ऑफ द इयर) निवडला आहे. मोबाइलवर (विशेषतः सामाजिक माध्यमांवर) तासन् तास राहिल्यामुळे मनाची होणारी अवस्था, असे सामान्यीकरण याचे करता येऊ शकते. या नव्या शब्दाविषयी…

ब्रेन रॉट’ म्हणजे काय ?
शब्दकोशात दिलेल्या अधिकृत अर्थानुसार, ‘‘ब्रेन रॉट’ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मानसिक किंवा बौद्धिक स्वास्थ्य खराब होणे. विशेषतः अतिशय किरकोळ अशा ऑनलाइन साधनांच्या अतिवापरामुळे होणारा परिणाम.’ याचा थोडक्यात उलगडा करून सांगायचा झाल्यास सामाजिक माध्यमांवर तासन् तास रील पाहणे, अपडेट्स पाहणे, नोटिफिकेशन्सवर लक्ष ठेवणे अशा बाबींमुळे मनावर परिणाम होतो. एकाग्रता भंग पावते. मन विचलित होते. सातत्याने हात मोबाइलकडे जातात. सामाजिक स्वास्थ्य बिघडते. एकांगीपणा वाढतो. संवाद हरवतो. मेंदूच्या अशा स्थितीची मांडणी करायची झाल्यास त्याला ‘ब्रेन रॉट’ असे म्हणावे लागेल.

ब्रेन रॉट’मध्ये नेमके काय होते?
मानवी मेंदूचा अतिरेकी वापर यामध्ये होतो. मेंदूच्या संवेदना जागृत होण्यासाठी ज्या सामग्रीची आवश्यकता असते, अशी सामग्री अर्थात कंटेन्टचा पुरवठा मेंदूकडे इतक्या अतिरेकी प्रमाणात होतो, की या सामग्रीची शहानिशा करणे आणि ही सामग्री पचवणे मेंदूला जमत नाही. माहितीचा मोठा पुरवठा करून मेंदूकडून अतिरेकी कामाची अपेक्षा ठेवली, की त्याची परिणती ‘ब्रेन रॉट’मध्ये होते. ऐकू येणे, चव, वास ओळखणे, स्मृती जागृत ठेवणे, कारणमीमांसा करणे, समस्या सोडविण्यासाठी मेंदूचा वापर, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व विकास आणि एकूणच अस्तित्वाच्या जाणिवेवरच डिजिटल व्यसनामुळे उद्भवलेल्या ‘ब्रेन रॉट’मुळे परिणाम होतो. ‘ब्रेन रॉट’मुळे होणारे प्रमुख परिणाम खालीलप्रमाणे

हायपरअॅक्टिव्ह वर्तन
मुलांमध्ये विशेष करून आक्रमकता वाढणे
व्यसनात्मक वर्तनाचा आकृतिबंध
झोपेवर परिणाम होत असल्याने मेंदूची नको असलेली माहिती काढून टाकण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम. त्यातून मेंदूची कार्यक्षमता कमी होते.
‘स्क्रीन टाइम’ जास्त होत असल्याने प्रत्यक्ष संवाद करण्याची क्षमता हरवून बसते. त्यातून अनेकदा कुटुंबीयांशीही मेसेज अथवा चॅटिंगने संवाद करण्यास प्राधान्य दिले जाते.

शरीरावर काय दुष्परिणाम?
एकाग्रता कमी होते. दीर्घ काळ करावी लागणारी कामे करावीशी वाटत नाहीत. ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या विसरल्यासारख्या होतात. रोजची दैनंदिन कामेही नीटशी आठवत नाहीत. सामाजिक माध्यमांमुळे मन गुंतलेले असते. पण, त्यातून मनाला अर्थपूर्ण काहीही मिळत नसल्याने याची अंतिम परिणती ‘ब्रेन रॉट’मध्ये होते. मोबाइलवर सततचे स्क्रोलिंग करणे, सामाजिक माध्यमांची चटक लागणे, रिवॉर्ड, नोटिफिकेशन्स आणि तत्सन ऑनलाइन बाबींमुळे मेंदू अधिक अलर्ट मोडवर राहतो. त्यातून इतर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.

ब्रेन रॉट’मधून मुक्त कसे व्हावे ?
विविध लक्षणांमधून आपण ‘ब्रेन रॉट’चे शिकार झालो आहोत, अशी शंका आली आणि डॉक्टरांकडूनही त्यास दुजोरा मिळाला, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू त्यातून बाहेर येता येते. सामाजिक माध्यमांवरील वावर, स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे आणि इतर उपाययोजनांतून मुक्त होता येते. तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. खालील उपाय योजता येतील.

स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे

  • आभासीपेक्षा खऱ्या आयुष्याचा अनुभव घेणे.
  • आठवड्यातून एकदा आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटणे.
  • विकास आणि माणूस म्हणून वृद्धी होईल, प्रेरणा मिळेल अशी सामग्री ऑनलाइन पाहणे.
  • डिजिटल व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी सातत्याने त्यापासून दूर राहणे.
  • दैनंदिन व्यायाम, वेळेवर जेवण आणि योग्य दिनचर्या ठेवणे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button