Mumbai

? Big Breaking.. काय आहे बीएचआर घोटाळा.? भाजपा चे माजी मंत्री गिरीश महाजन अडचणीत ..यानंतर कोणाचा नं…!

? Big Breaking.. काय आहे बीएचआर घोटाळा.? भाजपा चे माजी मंत्री गिरीश महाजन अडचणीत ..यानंतर कोणाचा नं…!

मुंबई : भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन अडचणीत आले आहेत. महाजनांचे उजवे हात समजले जाणारे व्यावसायिक सुनील झंवर यांच्यावर 1100 कोटींच्या बीएचआर सोसायटी घोटाळय़ात आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी केली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत महाजनांचे लेटरहेड बाहेर काढल्याने त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

‘भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी’शी (बीएचआर) संबंधित जळगावमधील पाच ठिकाणी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या 135 अधिकारी, कर्मचाऱयांच्या पथकाने छापे टाकले. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे सुनील झंवर यांच्या विविध फार्मवरदेखील छापे टाकल्याने ही कारवाई राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे.
सुनील झंवर यांच्या चौकशीची मागणी याआधीच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आली होती. भाजपमधील अन्यायामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करतानाच एकनाथ खडसे यांनी ‘तुमची ईडी तर आमची सीडी’ असा इशारा दिला होता. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला महिना उलटतो तोच गिरीश महाजनांचे उजवे हात सुनील झंवर अडचणीत आले. बीएचआरप्रकरणी सुरू झालेली ही कारवाई म्हणजे खडसे यांचा महाजनांना इशाराच असल्याचे मानले जात आहे.

काय आहे प्रकरण…

दीड हजार कोटींच्या आर्थिक घोटाळय़ात ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी जितेंद्र पंडारे यांची अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र, पंडारे यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांना हाताशी धरून कर्जदारांच्या जमिनी तसेच स्थावर मालमत्ता कवडीमोल भावात विकल्याचा आरोप आहे. ठेवींच्या रकमा मॅचिंग करण्यासह तडजोडीच्या प्रकरणात मोठय़ा प्रमाणावर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार अवसायकांमार्फत करण्यात आले. मात्र, ठरावीक व्यक्तींनी या जमिनी तसेच स्थावर मालमत्ता मातीमोल भावात खरेदी केल्या. यात सुनील झंवर यांचे नाव अग्रस्थानी आहे.

पुण्यातील राजकीय व्यक्तीकडून दबाव

राज्य सरकारमध्ये तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना आपण भेटून चौकशी करण्याची विनंती केली होती. 2018 ला मी पेंद्रीय मंत्री राधा मोहन सिंग यांना भेटून घोळ झाल्याचं सांगितलं होते. त्यावेळी त्यांनी राज्य शासनाला सदर प्रकरणाची चौकशी ईओडब्लू यांच्यामार्फत करण्याचे आदेश काढले होते. मात्र या प्रकरणाची

चौकशीत पुण्यात राजकीय व्यक्तीकडून दबाव आणण्यात आल्याने तात्पुरती स्वरूपाची चौकशी झाल्याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले. इतकेच नाही, तर त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनीदेखील बीएचआरचे अवसायक असलेले पंडारे यांच्याकडे माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिली नाही. पण बीएचआरची प्रॉपर्टी कमी किमतीत घेतल्याचे खडसे यांनी सांगितले.

2018पासून पाठपुरावा; बीएचआर घोटाळा प्रकरणात मोठय़ा व्यक्तींचे नाव – एकनाथ खडसे

बीएचआर गैरव्यवहारप्रकरणी 2018 पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असतानादेखील त्यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्य बाहेर येणार असून, या प्रकरणात बडय़ा नेत्याचे नाव असून ज्याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्याचा गौप्यस्पह्ट एकनाथ खडसे यांनी आज जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला.

झंवर यांचे भाजपसोबतचे नाशिक कनेक्शनही चर्चेत

झंवर यांच्या व्यवहारांचे नाशिक कनेक्शनही चर्चेत आहे. नाशिकमधील भाजपच्या अनेक पदाधिकाऱयांसोबत त्यांची नेहमीच ऊठबस आहे. महापालिकेतील अनेक ठेक्यांमध्येही झंवर यांची पार्टनरशिप असल्याची भाजपमध्येच चर्चा आहे. नाशिकमधील महाजनांची सावली असलेल्या बोरानामक व्यक्तीसोबतच अनेक पंत्राटामंध्ये ते भागीदार असल्याची चर्चा असल्याने या चौकशीचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

पुराव्याशिवाय मी बोलत नाही!

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी झालेल्या चौकशीदरम्यान सापडलेल्या कागदपत्रांमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटरपॅड आढळून आल्याबाबत बोलताना खडसे यांनी कोणाचे लेटरपॅड सापडले म्हणून त्याचा प्रकरणाशी संबंध येतो असे होत नाही. कारण कोणी चोरूनदेखील लेटर पॅड नेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली. गिरीश महाजन यांनी या प्रकरणात राजकारण केले जात असल्याच्या केलेल्या आरोपावर खडसे यांनी नुसतं तोंडी बोलून उपयोग नाही. पुराव्याशिवाय मी बोलत नाही. पुठलेही पुरावे नसताना माझ्यावरतीही आरोप करण्यात आले होते. अनेक वर्ष माझ्यावर अन्याय करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
– झंवर आणि गिरीश महाजन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. महाजन यांच्या आरोग्य शिबिरांसह अन्य कार्यक्रमांना झंवर यांच्या संस्थेचेच ‘फंडिंग’ असते. झंवर यांच्यावर एकनाथ खडसेंनी शालेय पोषण आहार घोटाळय़ात यापूर्वी अनेक वेळा गंभीर आरोप केले आहेत. विधानसभेत पुराव्यानिशी आरोप करूनही भाजप सरकारच्या काळात झंवर यांच्यावर कारवाई झालेली नव्हती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button