Mumbai

ग्लोबल मालवणी आयोजित, संभाषण कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न.

ग्लोबल मालवणी आयोजित, संभाषण कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न.

राहुल खरात
मुंबई-भांडुप
बोलायच कस, भीती वाटते, शब्द सुचत नाहीत, भाषणाची सुरुवात कशी करायची हे सुचन नाही, चेह-यावरील हावभाव, नजर, देहबोली, व्यासपीठावर आत्मविश्वासाने कसे वागावे, कसे बोलावे, अशा संभाषणात्मक विचारांची देवाण-घेवाण व्यक्त करण्यासाठी नुकताच भांडुप येथील पराग विद्यालयात ग्लोबल मालवणी संस्थेच्यावतीने विनामुल्य संभाषण कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी डाँ.महेश अभ्यंकर यांनी आपल्या एक हजार पेक्षा जास्त व्याख्यानांचा अनुभव सचित्र पुराव्यासहीत सर्वांसमोर मांडला.त्यातील खाजखळगे,भाषाशैली अशा विविध बाबींनवर मार्गदर्शन केले.
तसेच टीव्ही 9 मराठी व्रुत्तवाहीनीचे मुख्य व्रुत्तनिवेदक ऋषी देसाई यांनी आपले पत्रकारीतेतील अनुभव कथन केले.व व्यासपीठावर कस बोलाव,शब्दफेक कशी असावी,देहबोली,हावभाव,कसे असावेत,हे स्वत:प्रात्यक्षिक करुन दाखविले.रुषी देसाई यांच जोशपुर्ण भाषण सर्वचजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.त्यांनी सर्वच श्रोत्यांना खिळवुन ठेवले होते.
ग्लोबल मालवणीचे अध्यक्ष सचिन आचरेकर यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिषेक मुणगेकर,विजय पांचाळ,श्रुती उरणकर,गणेश गावडे,स्वप्नाली पांचाळ,संजय चव्हाण,नितिन नाईक, प्रफुल्ल मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.कार्यशाळेला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे
(दिग्दर्शक -पत्रकार)
९०८२२९३८६७

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button