Nashik

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी विद्यालयात स्वांतत्र दिन उत्साहात साजरा

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी विद्यालयात स्वांतत्र दिन उत्साहात साजरा

सुनील घुमरे

मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयात ७४ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य विजय म्हस्के यांनी केले .आपल्या भाषणातुन त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या .व राष्ट्रपुरूषाच्या कार्याचा गौरव केला .देशाची अंखडता टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आव्हान केले .
यावेळी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण माजी सैनिक सर्जेराव देशमुख यांनी केले व स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर यांनी केले .यावेळी व्यासपीठावर विलास पाटील, रामराव पाटील, नंदकुमार डिंगोरे, संतोष निकम,रंगनाथ घोलप, सुधाभाऊ सोमवंशी,डाॅ.चंद्रकांत पाटील शांताराम मौले , जी एम गायकवाड, एल टी गुरूजी विद्यार्थी प्रतिनिधी सायली गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते .

विद्यालयाचे संगित शिक्षक दिलीप पागेरे व गीतमंचने राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तिपर गीत सादर केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्व विशद केले .व देशाची गौरवशाली परपंरा सर्वांनी जोपासावी .परकीय शत्रुचा मुकाबला एकजुटीने करावा . आपल्याला मोठ्या कष्टाने स्वातंत्र्य आपल्या मिळलेले असुन ते आबाधित ठेवण्याची व टिकवण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले .

कार्यक्रमास पर्यवेक्षिका निर्मला शिंदे, अभिनवच्या मुख्याध्यापिका सोनाली देशमुख, नंदु पाटील, प्रदीप जाधव,अशोक गायकवाड, निवृती आहेर, शिवाजी शिंदे,उत्तम हाडोळे, नितिन जाधव, वसंत पगार, प्रमोद सोनवणे, योगेश मोगल, ज्ञानेश्वर भवर, अविनाश पालवी, मंगेश वाळके, तुषार गिते नंदु घोटेकर, छाया शिरसाठ, मनिषा पवार, ज्योस्ना पाटील, मनिषा जाधव, स्वरूपा थोरातआदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामनाथ गडाख यांनी केले व आभार प्रदर्शन शरद निकम यांनी केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button