अमळनेर नगरपरिषदेतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन..
माजी आमदार साहेबराव पाटील यांची उपस्थिती
अमळनेर / महेंद्र साळुंके
अमळनेर नगरपरिषदेतर्फे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, यांनी प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण केले.
यावेळी माजी आमदारांनी आपल्या मनोगतात सांगितले की दोन्ही महान नेत्यांनी फक्त भारतासाठी नाही तर विश्वासाठी आपलं कार्य समर्पित केलं आहे.महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, शांतीच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर माजी पंतप्रधान शास्त्री यांनी देशाला “जय जवान जय किसान” हा नारा दिला. यातून त्यांनी देशातील सैनिकांना व शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला.ज्या देशातील शेतकरी सुखी असेल तोच देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो हा विचार त्यांनी दिला आहे. या दोन महान नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील व राष्ट्र उभारणीतील कार्याचे स्मरण करून माजी आमदारांनी आदरांजली वाहिली.
यावेळी मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, जेष्ठ नेते जयवंतराव पाटील,लिपिक जोशी,तसेच कर्मचारी उपस्थित होते.






