Yewala

ममदापुर येथे नर जातीच्या हरणाला जीवदान!

ममदापुर येथे नर जातीच्या हरणाला जीवदान!

येवला प्रतिनिधी , विजय खैरनार

येवला, ता.१२ :तालुक्यातील ममदापुर येथील आज दुपारी तीन वाजता ममदापुर राखीव क्षेत्र लागत असणाऱ्या दिनकर वाघ यांच्या वस्ती समोरील 265 गट नंबर मध्ये हरणाच्या पड़साला कुत्र्याने पाटलाक कडून शेत वले चिखल असल्यामुळे त्याला जोराने पळता आले नसल्याने हरण कुत्र्यांच्या तावडी मध्ये सापडल्याने व त्यावर कुत्र्यांनी हल्ला केला तसेच काही वेळात ते तड़फडुन मरण पावणार तर सदर घटना पाहून स्थानिक तरुण बापू दिनकर वाघ कृष्णा दिनकर वाघ गोरख अहिरे शंकर दाणे शंकर काळे या तरुणांनी त्याचे त्या कुत्राच्या तावडीतुन सुखरूप सुटका करून त्याला पानी पाजुन जीवदान दिले आहे.

सदरची घटना ही माहिती गणेश नानासाहेब गायकवाड अध्यक्ष ममदापूर राखी वन्यजीव संवर्धन पथक यांना दिली सदर घटनास्थळी जाऊन पाहणी करून संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिली संबंधित अधिकारी येऊन त्या पाडसाला नर जातीच्या हरीण ला ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रामध्ये सोडण्यासाठी उपचार करण्यासाठी संबंधित अधिकारी घेऊन गेले आहे अश्या घटना या डरवेलेश उत्तर भागात घडत असतात तरी स्थानिक नागरिक यांनी संबधिक वनविभाग यांना सहकार्य करावे कुणी ही घाबरून न जाता प्राणी पक्षी चा प्राण वाचवा असा आवाहन वन विभाग च्या वतीने करण्यात अले आहेत…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button