शेषनगर येथे पारंपरिकतेने पोळा सण उत्साहात साजरा
चांपा प्रतिनिधी अनिल पवार
एक नमन गोरा पार्वती हर बोला हर हर महादेव च्या गजरात शेषनगर गावात पोळ्याचा सण साजरा करण्यात आला .गावात सर्वत्र शेतकऱ्यांकडून सकाळपासून आपल्या बैलांना सजवून पूजा करीत मिरवणूक काढण्यात आली.
शेतकऱ्याच्या सुख-दुखा:त नेहमी सोबत राहणारा ढवळ्यापवळ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा सण. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पोळ्यासाठी उत्साहाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पहाटे आंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंग लावण्यात आला. गळ्यात घंटांच्या माळा तर कपाळावर रंगबिरंगी गोंडे लावण्यात येऊन पाठीवर आकर्षक अशी झूल पांघरून सर्जाराजाची अगदी नवरदेवाप्रमाणे सजावट केली. यानंतर त्याला पुरणपोळीचा नैवद्य दाखवून गावातील मंदिरांमध्ये देवदर्शन घेण्यासाठी हलगीच्या तालावर थाटात मिरवणूक काढण्यात आली.यावेळी सरपंच अतिश पवार व बबन गोरामन यांच्या उपस्थितीत गावात पोळ्याचा सणाला व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली .उत्साहात गावात पोळ्याच्या सण साजरा करण्यात आला .







