Nashik

मनमाड ला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी पक्षाच्या आय यु ङी पी शाॅपीग सेंटर बांधकाम बदं करा मागणी साठी आंदोलन

मनमाड ला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी पक्षाच्या आय यु ङी पी शाॅपीग सेंटर बांधकाम बदं करा मागणी साठी आंदोलन

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-:मनमाड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पक्षाचा वतीने आंदोलन करण्यात आले आंदोलन करण्या चे मुख्य कारण मनमाड नगर पालिकेने आय यू डी पी येथे नविन शॉपिंग सेंटर चे बांधकाम सुरू केले आहे. सदर कामाचे रू ३.९६ कोटी रुपये मंजूर झाले आहे. मंजूर काम हे१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर आहे. मनमाड कराचा पाणी प्रश्न कायमचा दूर करण्यात मदत होईल या दृष्टीने मनमाड शहरातील नविन पाण्याची योजना करंजवण धरणातून पाईप लाईन द्वारे आणणे अत्यंत गरजेचे आहे. सदरील करंजवन योजनेचा हप्त्या पोटी नगरपालिकेने पैसै भरणे आवश्यक आहे. मनमाड नगर पालिकेच्या प्रस्तावित करंजवन पाणी पुरवठा योजने साठी जे तीन कोटी रुपये भरणा करायचा आहे. त्याचा हप्ता दर महा हप्ता रक्कम तीस लाख रुपये जनरल फंडातून भरावा लागत आहे. त्या साठी मनमाड नगर पालिके कडे १४ व्या वित्त आयोग कार्यात्मक अनुदान ४.९६ कोटी रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे.तर त्या अनुदान मधून रू 2 कोटी हे या फंड मधून वर्ग करून नगर पालिकेचा भोजा कमी होईल व करजवण योजना लवकर मागी लागेल. व मनमाड करांच पाणी प्रश्न कायमचा दूर होईल. तरी जो परंत ही रककम वर्ग होत नाही तोपर्यंत आय यू डी पी येथे नविन शॉपिंग सेंटर चे बांधकामला स्तगिती देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली असून जर असे झाले नाही तर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन करण्यात येईल. अशी काँग्रेस कमिटी पक्षाचा वतीने मागणी करण्यात येईल असा इशारा मनमाड नगर पालिके ला देण्यात आला .

यावेळी माजी मंत्री महाराष्ट्र राज्य मुजफ्फर हुसेन. मनमाड शहर ब्लॉक कांग्रेस कमेटी शहराध्यक्ष अफजल भाई शेख. रहेमान शहा. नाझीम भाई शेख नगरसेवक संजय निकम. नगरसेवक रवींद्र घोडेस्वार. नगरसेवक मिलींद उबाळे.अॅड. व्यवहारे. अन्सार भाई शहा. सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button