sawada

सावदा येथे शादीखाना हॉल बांधकामास नगराध्यक्षा व मुख्याधिकारी कडून एन,ओ,सी देण्यास टाळाटाळ!

सावदा येथे शादीखाना हॉल बांधकामास नगराध्यक्षा व मुख्याधिकारी कडून एन,ओ,सी देण्यास टाळाटाळ!

कलम ८१ प्रमाणे हॉल बांधकाम विषयी राष्ट्रवादी विरोधि गटनेते सह नगरसेवकांनी केली विषेश सभा घेणयाची मागणी

युसूफ शाहा सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे वाड झालेल्या व माझा माहिती प्रमाणे काही महिन्या पुर्वी न,पा हद्दीत समाविष्ट पना पिर नगर,रज़ा नगर,तसेच ख्वाजा नगर,ताजुशशरीया नगर या परिसरातील तसेच गावातील लोकसंख्येनुसार या भागात सर्व नागरीकांना लग्न कार्य करीता होत असलेला त्रास व लोकांची मांगणी सह विकासाच्या दृष्टिकोण समोर ठेवुन, मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते फिरोज खान पठाण व नगरसेवकांनी सदर परिसरात शादी खाना कम्युनिटी हॉल बांधून मिळावा अशी मागणी केली होती

यासंदर्भात शासन दरबारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेले प्रयत्न मुळे शादीखाना कम्युनिटी हॉल बांधण्यासाठी अनुदान व मिळालेली मंजुरी संदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा याला दिलेले आदेश प्रमाणे, सदर परिसरात शादीखाना हॉल बांधकाम करणे विषयी जागा ची सध्याचीस्थिती बाबत चे, कागदपत्री, माहिती व हमी सा, बां विभाग सावदा यांनी दि ४/२/२०२१ च्या पात्र द्वारे न,पा सावदा कडे मागीतलेली आहे

दरमियान सदर ठिकाणी शादीखाना हॉल उभारणे करिता ना हरकत दाखला व देखरेख संदर्भात होणारी सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते यांनी नगराध्यक्षा अनिता येवले व मुख्य अधिकारी सौरभ जोशी यांच्याकडे करूनही काही एक उपयोग झाला नाही

परिणामी शासनांनी शादीखना हाल ची मागणी मान्य केली याच्या सर्व समाजाला फायदा होणार आहे तसेच हॉलचा संपूर्ण खर्च शासन करणार असून आपल्या पालिकेस कोणताही खर्च नवीन हॉल करिता करावा लागणार नाही फक्त देखरेख संदर्भात ठराव करून पुढील होणाऱ्या सभेमध्ये ना हरकत प्रमाणपत्र देऊन मान्यता मिळणे कामी नाईलाजाने शादीखाना हाल बांधकाम बद्दल कलम ८१ प्रमाणे विशेष सभेमध्ये हा विषय घेऊन ठराव करण्यात यावा अशी मागणी चा लेखी निवेदन नगर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी नगरपरिषद सावदा यांना देण्याची वेळ येथील‌ विरोधि गटाचे नगरसेवकांनवर जन हिताकरिता व विकास चे काम मार्गी लावण्यासाठी येणे आश्चर्याची बाब आहेत.या निवेदनावर नगरसेवक राजेश वानखेडे, विरोधी गटनेते फिरोजखान पठाण ,अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी, सिद्धार्थ बडगे ,नगरसेविका मीनाक्षी कोल्हे ,विजया कुशल जावळे, नाजरा बी ईस्त्याक घ बेंडाळे, अपक्ष नगरसेवक अल्लाबक्ष व विशेषकर सत्ताधारी गटाची नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांच्या सह्या आहे

ज्या ठिकाणी शादीखाना हाल करिता मंजुरी मिळालेली आहे तो सर्व परिसर मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचा असल्यामुळे की काय ? न,पा सत्ताधारी गट कडून नवीन मंजूर हाल बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास टाळा टाळ तर केली जात नाही ना? नाही तर ना हरकत प्रमाणपत्र न देणया पलीकडचे नेमके कारण काय? याच धरती वर विविध संतापजनक प्रशन पडणे स्वाभाविक आहे बहुमताच्या आधारावर जनतेच्या व विकासाच्या कामास कारण नसताना विलंब लावून त्या खंडपाडणे प्रजादक्षतेचा भाग नसून थेट मनमानी करणे सारखेच आहे अशी प्रतिक्रिया विरोधीगटनेते फिरोज खान पठाण व येथील‌ नागरीकांनी व्यक्त केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button