?️Big Breaking..प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीच्या घरी येणार नवा पाहुणा…
कोहलीने आपल्या पत्नीच्या प्रेग्नन्सीची घोषणा करत सोशल मीडिया पोस्ट गुरुवारी अनेक भारतीय साथीदारांच्या शुभेच्छासह प्रसारित केली.
मोस्ट हॅपनिंग सेलिब्रिटी कपल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, जागतिक ख्यातीचा क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या नात्यात आता एक नवा पाहुणा येणार आहे.
अनुष्का आणि विराट या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो पोस़्ट करत गोड बातमी दिली आहे. ही बातमी आहे या दोघांच्या नात्यात येणाऱ्या बाळाची.. विराटने ट्वीट करताच सोशल मीडियावर #Virushka ट्रेंड करत आहे. तसेच सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.
“अॅण्ड देन, वी वर थ्री… अराईव्हिंग जानेवारी 2021,” असं लिहित विराट आणि अनुष्काने गुडन्यूज शेअर केली. यानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.दोघांनी जशी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली, तसा सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे.






