मोहाडीच्या कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयास अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन कडून लॅपटाॅप भेट…
प्रतिनिधी : सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील करणारे विद्यालयास
अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे ‘अन्वेषणा- २०२०’ सायन्स आणि इंजीनियर फेअर हा इव्हेंट १६ ते १८ फेब्रुवारी २०२० रोजी नेहरू सेंटर,वरळी,मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.महाराष्ट्रातील अनेक नामवंत इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी यांनी यात सहभाग नोंदवला.
यातील ३६ प्रोजेक्टची ‘अन्वेषणा – २०२०’ मध्ये निवड करण्यात आले.यामध्ये नाशिकच्या संघवी काॅलेज ऑफ इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला मल्टीपर्पज ऐग्रिकल्चर ऑटोमेटिक सिस्टम या प्रकल्पाची निवड करण्यात आली. इनव्हेंशन – २०२० मध्ये इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांचा देखील सहभाग असतो . ज्यामुळे एखादी संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळते .विज्ञान व इंजीनियरिंग गोष्टीविषयी नवीन गोष्टी शिकायला मिळतात .तसेच विज्ञानाची भिती कमी व्हावी . विज्ञानाची गोडी वाढावी व नवीन संशोधनाला चालना मिळावी हा यामागील उद्देश्य असतो .
या प्रकल्पात संघवी काॅलेज ऑफ इंजीनियरिंगचे विद्यार्थी हर्षल माळोदे, गणेश घाडगे, निर्भय लभडे, अभिजित गायकवाड व थोरात विद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश गोवर्धने याला इंजीनियरिंग व विज्ञान या प्रकल्पाची माहिती देऊन सहभागी करून घेतले. एखादी आयडिया टू इनोव्हेशन पद्धती कशा करायच्या त्या प्रत्यक्षात कशा आणायच्या आदी विषयी माहिती दिली.या प्रकल्पात वरील विद्यार्थ्यांनी ” मल्टीपर्पज ऐग्रिकल्चर ऑटोमेटिक सिस्टम हा प्रकल्प सादर केला.
या प्रकल्पाला पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.त्याबद्दल ‘अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन’ च्या वतीने प्रथमेश गोवर्धने थोरात विद्यालयाच्या या विद्यार्थ्यांने सादर केलेल्या प्रकल्पाबद्दल डेल कंपनीचा लॅपटॉप ‘थोरात विद्यालयाला ‘ अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने समीर मुळे (एरिया लिड) यांनी विद्यालयाचे प्राचार्य विजय म्हस्के यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका निर्मला शिंदे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
प्रथमेश गोवर्धने याच्या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार,सभापती माणिकरावजी बोरस्ते, तालुका संचालक दत्तात्रय पाटील,शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर, विलास पाटील, शहाजी सोमवंशी , प्रविण जाधव ,रामराव पाटील, सुदाम पाटील ,मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ .संजय शिंदे विद्यालयाचे प्राचार्य विजय म्हस्के ,पर्यवेक्षिका निर्मला शिंदे ,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.






