आरोग्याचा मुलमंत्र..पेरू सेवनाचे फायदे
पेरूचा रस आपल्याला हायड्रेटेड ठेवतो. पेरूमध्ये जीवनसत्त्व ‘क* चे प्रमाण संत्र्यापेश्षा चारपट जास्त आहे. आपल्या पाचन तंत्रासाठी पेरू उत्कृष्ट आहे. तंतूंचा एक समृद्ध स्रोत असल्याने नैसर्गिक रेचक म्हणून कार्य करते.
पेरूमध्ये असणारे जीवनसत्त्व ‘अ’ हे त्वचेचे आरोग्यास व डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर पेरू फळामधील कॉपर, मॅग्रेशिअम असल्यामुळे रक्तनिर्मितीसाठी फायदेशीर ठरते.
१) गरोदरपणात
गर्मवती महिलांसाठी पेरू खूप चांगला आहे. त्यामध्ये असलेले फॉलिक ऑसिड किंवा व्हिटॅमिन बी-९ मुलांची मज्ञासंस्था विकसित करण्यास मदत करते. याद्यतिरिकक्त पेरू लहान मुलांना न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरपासून वाचवते
२) ताण कमी
पेरूमध्ये उपस्थित मॅग्नेशियम शरीराच्या मज्ञातंतू आणि स्नायूंना आराम देते. दिवसभर जोरदार वर्कआउटनंतर एक पेरू खा. है प्रवास आणि कामाचा ताण कमी करण्यात खूप मदत करते,
३) वजन कमी करा
आपल्या आहारातील प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि फायबर कमी न करतापेरू वजन कमी करण्यास मदत करते. दररोज एक पेरू आपल्या चयापचय नियंत्रित करते आणि वाढत्या वजनावर ब्रेक लावते. कारण केळी, सफरचंद, संत्री यासारख्या इतर फळांपेक्षा पेरूमध्ये साखर कमी असते.
पेरूचा रस घेतल्याने आपल्या पाचन तंत्रामध्ये तंतूचा आकार वाढत जातो. अतिसार आणि डायजेन्ट्रीसारख्या इतर पाचन विकारांची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते कारण त्यात अंटीमायक्रोबियल गुणधर्म आहेत. हे पोटॅशियम आणि व्हिटय़ामिन सी सारख्या इतर पोषक तत्वे निरोगी ठेवून पाचक प्रणाली निर्जतुक करते.
४) व्हिटॅमिन “सी’चा एक चांगला स्त्रोत
पेरूचा रस विटामिन ‘सी’चा एक चांगला स्त्रोत आहे जो उधरक्तदाव विरुद्ध लढाला काम करतो. हे एंटीऑक्सीडेंट म्हणून कार्य करते जे आपल्याला जुनाट आजारापासून वाचवते. यामुळे इदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
५) कर्करोगाचा धोका कमी
पेरू फळातील लाइकोपीन, केरेसेटिन, जीवनसत्त्व ‘क’ आणि अँटीऑक्सिडंट हे घटक आपल्या शरीरात कर्करोगास कारणीभूत पेशींना प्रतिबंधित करतात. लाइकोपीन स्तनाच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करते. म्हणूनच दररोज एक पेरू खावा.
डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथी तज्ञ )






