Latur

केंद्र सरकार,महाराष्ट्र सरकार कर्मचारी,डॉक्टर यांना शहिदांचा दर्जा व त्यांच्या कुटुंबांना सर्व सोयी देणार का?.. संभाजी ब्रिगेड प्रदेश प्रवक्ते,डॉ.शिवानंद भानुसे

ओडिसा सरकारने आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना शहिदांचा दर्जा व त्यांच्या कुटुंबांना सर्व सोयी देण्याची केली घोषणा. केंद्र सरकार,महाराष्ट्र सरकार केव्हा करणार ?.. संभाजी ब्रिगेड प्रदेश प्रवक्ते,डॉ.शिवानंद भानुसे

कोरोना या महामारीने जगभरामध्ये थैमान घातले आहे. चीन, इटली, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स ही प्रगत राष्ट्रे देखील हतबल झाली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचाली पाहता हे जैविक महायुद्ध सुरु आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आपल्याही भारत देशामध्येही कोविड 19 (कोरोना) या महामारिने थैमान घातले आहे. देशातील सर्वच राज्यात हा विषाणु आनेक मार्गाने पोहचला आहे. राज्यातील प्रमुख शहरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धात आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर व आरोग्य कर्मचारी लढा देत आहेत. या संवेदशील परिस्थिती मध्ये नागरिकांना सेवा देणारे डॉक्टर व हॉस्पीटलचे कर्मचारी सुद्धा मृत झाले आहेत.आरोग्य क्षेत्रातील ज्या व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत या विषाणूशी धैर्याने लढा देत आहेत, त्यांच्या या देशाप्रती प्रामाणिक सेवेची योग्य दाखल घेऊन ही देश सेवा बजावत असताना ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना शहिदांचा दर्जा, कुटुंबियांना पन्नास लाख रुपये व कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीची घोषणा ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी २१ एप्रिल रोजी केली आहे.हीच मागणी ई मेलद्वारे निवेदन देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संभाजी ब्रिगेडने १३ एप्रिल रोजी केली आहे.आता केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार केव्हा निर्णय घेणार ? असा सवालही संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे.
त्यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्यासह केंद्रीय कार्यकारणीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १३ एप्रिल रोजी, चर्चा झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला असून त्या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
देशामध्ये थल सेना, जल सेना, वायू सेना, पोलीस इ. कर्मचाऱ्यांचा देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्यास सरकार या नात्याने सर्वोतपरी मदत करण्यात येते. त्याच प्रमाणे सद्याच्या विदारक परिस्थिती मध्ये प्रत्यक्ष कार्यरत असलेले सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स इ. मृत झाल्यास शहीद घोषित करून त्याच्या परिवाराला सर्वतोपरी मदत करावी. सध्या ही अत्यावश्यक सेवा बजावत असलेल्या कर्मचार्‍यांप्रती आपण सर्वांनी विविध मार्गाने सहानभूती व आदर व्यक्त केला आहे.त्याचबरोबर शहीदांचा दर्जा देण्याचा निर्णय तात्काळ घेऊन त्यांच्या देश सेवेची यथोचित नोंद घेतली जात आहे. हा विश्वास देऊन त्यांच्या कार्याप्रती प्रोत्साहन मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले असल्याचे डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button