ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फौंडेशन तर्फे कोरोना योद्धा प्रमाणपत्र व काढा वाटप
चांदवड उदय वायकोळे
चांदवड येथील ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फौंडेशन तर्फे पोलीस स्टेशन कर्मचारी,आरोग्य सेवा कर्मचारी, पत्रकार यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. फौंडेशन च्या अध्यक्ष रिंकू कासलीवाल व चांदवड नगरपरिषदचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी सामाजिक बांधीलकीतून असा उपक्रम हाती घेतल्याने कोरोना योद्धांमध्ये स्फूर्ती निर्माण झाली आहे.
तसेच फौंडेशन तर्फे चांदवड नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी 5000 आयुर्वेदिक काढ्याच्या पुड्या वाटप करण्यात आल्या. सदर काढा हा चाळीसगाव येथील वैद्य यांचेकडून मागविण्यात आल्याचे भूषण कासलीवाल यांनी ठोस प्रहार च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आणखी 1500 पुड्यांची मागणी झाल्याने अधिक पुड्या मागविण्यात आल्याचे कासलीवाल यांनी सांगितले.






