Chalisgaon

वाकडी ते मुंदखेडे रस्त्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते भूमिपूजन,

वाकडी ते मुंदखेडे रस्त्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते भूमिपूजन,

४३ लाख रुपयांच्या निधीतून उजळणार २.५ किमी रस्त्याचे भाग्य…

मनोज भोसले

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाकडी ते मुंदखेडे या रस्त्याचे भाग्य उजळले असून आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर रस्त्याचे वाकडी येथे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ३०५४ लेखाशीर्ष अंतर्गत या २.५ किमी रस्त्यासाठी ४३ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी जि.प. सभापती पोपटतात्या भोळे, पंचायत समिती उपसभापती संजू तात्या पाटील, सदस्य सुभाष दादा पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, वाकडीचे सरपंच प्रकाश चौधरी, वाघडूचे सरपंच रविंद्र पाटील, पत्रकार एम.बी.पाटील, अमोल चव्हाण, जितेंद्र वाघ, राजेंद्र बापू पाटील, माजी नगरसेवक निलेश महाराज, गुलाब पाटील, राहुल पाटील, गिरीश बराटे विजय पाटील, मनोज गोसावी, पितांबर अण्णा चौधरी, आबा पोलीस, रमेश अण्णा आदी उपस्थित होते.

केंद्रात, राज्यात, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आदी सर्व ठिकाणी भाजपची सत्ता असल्याने विकासकामांना मोठी गती मिळणार आहे, रस्त्यांची कोट्यावधींची कामे तालुक्यात सुरु असताना ती चांगल्या दर्जाची व दीर्घकाळ टिकणारी अशी करून घेण्याची लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असल्याचे मत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button