निफाङला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बनकर यांनी घेतला शासकीय विभागांचा आढावा.
प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक-: निफाड तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र भीती पसरली असून कोरोना आजाराचे रुग्ण आढळल्या पासून या महामारीतून बाहेर पडण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील कर्मचारी सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्य अबाधित राखण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी तालुक्याच्या सर्व शासकीय विभागाच्या प्रमुखांची बैठक घेत सर्व विभागाचा आढावा घेतला. या बैठकीत पिंपळगाव बसवंत येथे उभारण्यात आलेल्या कोरोना सेंटरमध्ये साफसफाई, बिछाना व जेवणाबाबत काही नागरिकांच्या तक्रारी आल्या असून यापुढे सेंटरमध्ये साफसफाई व जेवणाबाबत उपाय योजना करण्यात याव्यात व यापुढे तक्रार येणार नाही.
अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. पोलीस विभागाला आपल्या हद्दीतील कुठल्याही प्रकारचे अवैद्य धंदे सुरु होऊ नये याकरीता कार्यवाही करण्यात यावी तसेच इतर वाद लवकरात लवकर मार्गी लावावे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमीओपॅथिकच्या अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वाटप करण्यात आले असून त्याबाबत आढावा घेण्यात आला असून शिल्लक राहिलेल्या कुटुंबियांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तहसिल कार्यालयामार्फत नागरिकांना रेशन कार्ड वाटप तात्काळ करण्यात यावे तसेच निफाड नगरपंचायतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमा अंतर्गत रु.४.८० कोटी निधी मंजूर झालेला असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत.
निफाड कारखान्यावर ड्रायपोर्ट मुल्याकंन संदर्भांत तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याअसुन कोरोना व इतर विविध अडचणींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे, निफाडचे तहसिलदार दिपक पाटील, निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी, निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकरी डॉ.संदीप कराड
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चेतन काळे, पोलीस उपअधिक्षक सचिन थोरबोले, निफाड नगरपंचायत मुख्याधिकारी पंकज गोसावी, प्रकल्प अधिकारी अभिमान माने, पोलीस निरीक्षक संजय महाजन, भगवान मथुरे, रंगराव सानप, सहायक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ आदी अधिकाऱ्यासमवेत रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे उपस्थित होते.






