Maharashtra

चांपा येथे राजस्व अभियानाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

चांपा येथे राजस्व अभियानाला नागरिकांचा  उदंड प्रतिसाद 

चांपा येथे राजस्व अभियानाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

चांपा प्रतिनिधी अनिल पवार
तहसिल कार्यालय उमरेड व गट ग्रामपंचायत चांपा यांच्या संयुक्त विद्यमाने चांपा ग्रामपंचायत येथे राजस्व अभियान अंतर्गत विविध शासनाच्या योजनांच्या शिबिर ला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला अंदाजे बाराशे ते पंधराशे  लोकसंख्येत  लोकांनी राजस्व अभियानाचा लाभ घेतला राजस्व अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये समाधान शिबिर मध्ये राशनकार्ड , जातीचे प्रमाणपत्र , उत्पन्न प्रमाणपत्र , मतदान कार्ड , श्रावणबाळ व निराधार योजना , उज्वला योजना , डोमिसियल प्रमाणपत्र , नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र , जिवनज्योती विमा योजना , सुकन्या योजना , अटल पेन्शन योजना , आदी योजनांना नागरिकांनी प्रचंड गर्दी केली .यावेळी उमरेडचे राजस्व उपविभागीय अधिकारी जे .पी .लोंढे व तहसिलदार प्रमोद कदम यांच्या हस्ते विविध शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला .व राजस्व अभियान मध्ये योजनांचा लाभ देतांना राशनकार्ड , उत्पन्न प्रमाणपत्र आदी योजनांच्या लाभार्थ्यांना आदेश पत्र देऊन वाटप करण्यात आला .यावेळी चांपा ग्रामपंचायतचे सरपंच अतिश पवार होते .अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी  बहादूरकर  पाचगावचे मंडळ अधिकारी भुरे , मुरमे , आरघोडे , आरेकर , चांपा तलाठी प्रियंका अलोने , ग्रामसेवक सुनील तायवाडे , सेतू कनिष्ठ लिपिक योगेश डहाके , आपले सरकार सेवाचे  चंदन डांगे अनिल खोडे आदीच्या सहकार्याने राजस्व अभियान यशस्वीपणे पार पडले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button