Paranda

घरकुल बांधकामा साठी वाळू उपलब्ध करुन द्या रॉ .कॉ. च्या सामाजिक न्याय विभागाची मागणी

घरकुल बांधकामा साठी वाळू उपलब्ध करुन द्या रॉ .कॉ. च्या सामाजिक न्याय विभागाची मागणी

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा )

परंडा शहरा सह तालूक्यात रमाई घरकुल , इंदिरा अवास योजना , प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत मंजुर झालेल्या घरकुला च्या बांधकामा साठी मोफत ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाच्या वतीने दि १४ रोजी तहसिलदार परंडा यांच्या कडे करण्यात आली आहे .

सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने प्रभारी तहसिलदार डॉ तुषार बोरकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालूक्यात विविध योजने अंतर्गत घरकुले मंजुर झालेली आसुन घरकुल बांधकामा साठी वाळू उपलब्ध नसल्याने बांधकाम रखडले आहे .
घरकुल बांधकामा साठी महाराष्ट्र शासनाचा ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू देन्याचा शासन निर्णय आसुन या निर्णया नुसार वाळू देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .

निवेदनावर जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे , तालुका अध्यक्ष विक्रम जाधव , जिल्हा संघटक लक्ष्मीकांत बनसोडे , घनशाम शिंदे अजय बनसोडे रंगनाथ ओव्हाळ, रणधीर मिसाळ ,अनिल बनसोडे, राजाराम शिंदे ,पवन वाघमारे महादेव जमदाडे, प्रल्हाद बनसोडे, माया सितापे नितीन शिंदे, भागवत चौधरी, महादेव सरवदे, नंदकुमार सोनवणे, सुनील बनसोडे ,अशोक बनसोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button