Ausa

ए सी एफ कॅम्प ला पोलिस उपनिरीक्षक गुंडे यांची भेट. व जवानांचे कौतुक

ए सी एफ कॅम्प ला पोलिस उपनिरीक्षक गुंडे यांची भेट. व
जवानांचे कौतुक

लक्ष्मण कांबळे

औसा तालुक्यातील जवळ पोमादेवी येथे 24×7 रात्रंदिवस पहारा देणाऱ्या सर्व अँटी कोरोना सदस्यांचे ते करत असलेल्या कामाचे प्रत्यक्ष भेट देऊन किल्लारी पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल गुंडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन अँटी कोरोना फोर्स मध्ये सर्व सहभागी तरुणांचे कौतुक करून सर्वांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी बोलताना पोलीस उप निरीक्षक अमोल गुंडे म्हणाले कि अँटी कोरोना फोर्स चे जवळगा पोमादेवी येथील टीम यशस्वीरीत्या नियोजन करत असलेली निस्वार्थ सेवा खरोखर उल्लेखनीय व अनुकरणीय आहे.तसेच येणाऱ्या काळात गावात कोरोना पोहचू नये याची संपूर्ण खबरदारी या ए. सी. एफ.टीम ने घ्यावी तुम्हाला सरकार प्रशासन पोलीस प्रशासन सर्व काही सहकार्य करेल असेही आश्वासन श्री गुंडे यांनी जवळगा येथील ए.सी.एफ. टीम ला देऊन
सर्व अँटी कोरोना फोर्स सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button