बारामतीत भाजीपाला विक्रतेस कोरोनाची लागण
प्रतिनिधी-आनंद काळे
बारामती- बारामती परिसरातील श्रीरामनगर येथील भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यक्तीस कोरोना लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे.यानंतर श्रीरामनगर हा केंद्रबिंदू धरून तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून तर पाच किलोमीटरपर्यन्तचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे असे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा ह्यातून वगळण्यात आल्या आहेत.अनेक लोकांना बाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आत्ता प्राशासनाने संबधीत लोकांचा तपास सुरू केला आहे.आत्ता बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये असे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे आवाहन केले आहे.पोलिसांनी हा परिसर सील केला आहे व तपासणीनंतरच वाहन सोडण्यात येणार आहे.पोलिसांनी ह्या भागात चौकी उभारली असून, कोणीही घराबाहेर पडू नये असे स्पष्ट केले आहे.रिक्षाचालक कोरोनाबधित रुग्णाची प्रकृती आत्ता सुधारत असताना इतरांची टेस्ट नेगिटिव्ह आली असताना आत्ता भाजीपाला विक्रेता कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने बारामतीकरांची झोप उडाली आहे.बारामती नगरपालिकाने आत्ता सर्व भागाचे सर्वेक्षण करण्याचे सुरुवात केली आहे.






