Amalner: यात्रेत गेलेल्या महिलेचा विनयभंग..!
अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रेत फिरायला गेलेल्या महिलेचा विनयभंग करून पतीला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पैलाड येथील चार तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, कोष्टीवड्यातील एक महिला १७ रोजी रात्री १० वाजता यात्रेत पालखीवर बसण्यासाठी रांगेत उभी असताना पैलाड येथील हर्षल नाना पाटील उर्फ पाट्या (वय २४) आणि प्रवीण उर्फ चिया प्रकाश पाटील (वय २२) या दोघांसह अज्ञात दोघांनी महिलेचा विनयभंग केला.यावेळी पती मध्ये पडला तर त्याला मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. अमळनेर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






