Amalner: निम येथील ग्रामसेवकास 3 दिवसांची पोलीस कोठडी..!
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील ग्रामसेवकास लाचप्रकरणी काल न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
6याबाबत सविस्तर माहिती अशी की वीट भट्टीसाठी ग्रामपंचायत कडून नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची लाच स्वीकारताना तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने रंगे हाथ पकडले होते.
काल अमळनेर न्यायालयात निम येथील ग्रामसेवक आर एल पाटील यांना हजर केले असता जिल्हा न्यायाधीश एस बी गायधनी यांनी त्यांना अधिक चौकशीसाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या कामी सरकारी वकील किशोर आर बागुल यांनी युक्तिवाद केला तसेच एसीबीचे अधिकारी शशिकांत पाटील यांनी देखील न्यायालयात युक्तिवाद केला.






