Nashik

जल जीवन मिशन अंतर्गत सप्तशृंगी गडावरती 9 कोटी 43 लाख रुपये कामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन

जल जीवन मिशन अंतर्गत सप्तशृंगी गडावरती 9 कोटी 43 लाख रुपये कामाचा शुभारंभ..केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक:- नाशिक जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार यांच्या हस्ते नऊ कोटी 43 लाख रुपयाचे जलजीवन मिशन अंतर्गत भूमिपूजन श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी करण्यात आले साडेतीन शक्तीपीठा पैकी सप्तशृंगी गड आद्यापीठ असून या ठिकाणी रोज हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात त्यामध्ये चैत्र उत्सव व नवरात्र उत्सव दोन्ही यात्रा मिळून 50 ते 60 लाखाच्या पुढे भाविक येत असतात या भाविकांना गेल्या कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा अडचण निर्माण होत आहे तसेच सप्तशृंगी गडावर राहण्यारे ग्रामस्थ यांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे
सप्तशृंगी घाटाच्या मधोमध भवानी पाझर तलाव आहे या तलावाचे सुद्धा दोन वेळेस काम करून सुद्धा यामध्ये पाणी थांबत नाही यामुळे कित्येक वेळेस कोटी रुपये निधी आला परंतु तो पाण्यात गेला असे म्हणण्याची वेळ सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांमध्ये आली आहे या तलावाची कायम गळती चालू असते त्यामुळे सप्तशृंगी गडाला पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो यामुळे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांना वेळोवेळी सांगून सप्तशृंगी गडावरील येणाऱ्या भाविकांना व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहता येऊ नये याकरता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सप्तशृंगी गडावरती भारतीताई पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येईल असे सांगण्यात आले या ठिकाणी आलेल्या पदाधिकारी यांना भारती पवार यांच्याकडून कडक निर्देश देण्यात आलेले आहेत की हे जे उद्घाटन होणार आहेत हे वेळोवेळी होत नाहीये त्यामुळे काम निकृष्ट प्रतीचे करू नये तसेच आपण ही जी पाण्याची टाकी बनवणार आहेत ही भविष्याचा विचार करून बांधावे उद्या कुठल्याही प्रकारची कामात अडचण उत्पन्न होता कामा नये अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल असे भारती पवार यांच्याकडून आलेल्या प्रशासनातील सर्व अधिकारी यांना सांगण्यात आलेले आहे तसेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सप्तशृंगी मातेच्या मंदिराचे भूमिपूजन सुद्धा करण्यात आले हे मंदिराची साधारणतः सात कोटी रुपये इतका खर्च येणार असून आई भगवतीचे मंदिर हे भव्य आणि दिव्य असणार आहे असे सांगण्यात आले यावेळेस नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सुद्धा प्रशासनाला सक्त ताकीद दिलेले आहे यावेळेस कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार राजेश गवळी धनंजय गायकवाड ता अध्यक्ष दीपक खैरनार .रुपेश शिरोडे
प्रकाश कडवे स.गड शहराध्यक्ष
रामप्रसाद बत्तासे, भूषण देशमुख, विनायक दुबे, आनंद वाघ, राजू वाघ,पुरोहित संघ, तसेच पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी व सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ ग्रामपंचायत ग्रामसेवक सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button