अमळनेर: चोऱ्यांचे सत्र थांबेना..! दोन दुचाकी चोरीस..!
अमळनेर तालुक्यात सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.आता दोन दुचाकी चोरीस गेल्या असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे येथील दिनेश यावंत चौधरी यांची दुचाकी क्र MH 18 , AV-4715 ही 13 डिसेंबर रोजी 12 ते 3 वाजे दरम्यान सुजाण मंगल कार्यालय बाहेरून चोरीस गेली नेली आहे. पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा अज्ञात व्यक्ती विरुद्ध दाखल करण्यात आला असून तपास एएसआय रामकृष्ण कुमावत करत आहे.
दुसऱ्या एका घटनेत खडके येथील गणसिंग चांद्रसिंग पाटील यांची दुचाकी क्र MH19 , AM- 9472 ही 16 डिसेंबर रोजी चोरट्याने चोरून नेली आहे.सदर गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






