sawada

खेदजनक :- सावदा न.पा.बांधकाम विभागाचे बोलके जाहीर प्रदर्शन : बघा कसा वाहून जात आहे गटारीच्या पाण्यात सरकारी पैसा!

खेदजनक :- सावदा न.पा.बांधकाम विभागाचे बोलके जाहीर प्रदर्शन : बघा कसा वाहून जात आहे गटारीच्या पाण्यात सरकारी पैसा!

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिके मार्फत शहरातील सोमवारगिरी मढीच्या मागे नाल्यात गेल्या काही दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली गटारीचे काम ठेकेदाराकडून अतिशय कमकुवत व निकृष्ट करण्यात येत असल्याची वेळोवेळी तक्रार काही नगरसेवकांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करून सदरचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

मात्र याबाबत ठेकेदारास फक्त नोटीस बजावून संबंधित अधिकारी यांनी या गटार बांधकामकडे वेळप्रसंगी जातीने लक्ष न देता एका प्रकारे वेळ मारुपणा केल्याचे स्पष्ट दिसून येते. यामुळे थेट सरकारी पैसा गटारीच्या पाण्यात वाहून जाताना उघडपणे दिसून येते.तसेच सोमेश्वरनगरात सुद्धा जानेवारी २०२२ मध्ये लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या गटारीचे बांधकाम दर्जात्मक न होता माती मिश्रित (रेती) वाळूचा वापर राजेरोजपुणे करून ठेकेदारांकडून बांधकाम केले जात होते. याबाबत ही येथील नागरिकांनी पुराव्यानिशी तक्रार करून पालिका बांधकाम विभागाची स्थापत्य अभियंता अविनाश गवळे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.यावेळी सुद्धा ठेकेदारास फक्त नोटीस बजावून जैसे थे हीच बेजबाबदारीची भूमिका सतत सोयस्कररित्या पालिका बांधकाम विभागाकडून घेतली जाते.आणि उलट निकृष्ट काम होत असल्याची तक्रार नागरिक व नगरसेवकाकडून केल्यावरही ठेकेदाराची लाखोची बिले मंजूरीची शिफारिश करून विकासाकरिता खर्च केला जाणारा सरकारी रकमेचा अधीक लाभ निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदाराला होत असते.तरी या चुकींच्या कामांकडे प्रशासकीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी कैलास कडलग फैजपूर सह पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वारंवार होणारे सदरील प्रकाराची घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करावी.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button