शेतकऱ्यांसाठी खुशखबर एका क्लिक वर मिळणार सर्व योजनांचा लाभ
ठाकरे सरकार शेतकरी हितासाठी आग्रही आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी वेगवेगळा अर्ज करावा लागतो, मात्र यापासून आता शेतकऱयांची सुटका होणार आहे. आता केवळ एका ऑनलाइन अर्जातच शेतकऱयांना सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी या खरीप हंगामापासूनच सुरू होईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
अर्जावर संबंधित प्रशासनाने कोणता निर्णय घेतला. अर्ज कोणत्या डेस्कपर्यंत पोहोचला या सर्वाची माहिती अर्जदार शेतकऱयाला एसएमसद्वारे त्याच्या मोबाईलवरच मिळणार आहे. त्यामुळे कृषिविभागाच्या कार्यालयात हेलपाटा मारण्याचीही गरज लागणार नाही. सर्वच टप्प्यांकर मानवी हस्तक्षेप कमी होणार असल्याने योजनांमध्ये पारदर्शकता येईल, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

योजनेसाठी मोबाईल ऍप सातबारा जोडण्याची गरज नाही!
‘महाडीबीटी पोर्टल’ क ‘महाभूलेख’ संकेतस्थळाची जोडणी करण्याचे काम प्रगतिपथाकर आहे. ते पूर्ण होताच शेतकऱयांना अर्जासोबत ‘सातबारा’ आणि 8अ ही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. या योजनेचे मोबाईल ऍप देखील विकसित करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या आहेत.
दरवर्षी नव्याने अर्जाची गरज नाही
आतापर्यंत शेतकऱयाला कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज करावा लागतो तोही दरवर्षी. आता मात्र योजना कोणतीही असेना अर्ज फक्त एकदाच करायचा आहे. अर्ज छाननी, निवड, लाभार्थ्याला पात्र-अपात्र ठरविणे, पूर्वसंमती, मंजुरी आदेश, अनुदानाचा लाभ देणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन प्रणाली मार्फत केली जाणार आहे. जर एखाद्या शेतकऱयाला विशिष्ट योजनेतून त्याच्या मागणीनुसार लाभ देता येत नसेल तर अन्य दुसऱया कुठल्या योजनेतून देण्याची कार्यकाही करेल आणि लाभ दिला जाईल. एखाद्या वर्षी शेतकऱयाची निवड झाली नाही तर त्याचा अर्ज बाद न होता पुढच्या वर्षासाठी तो ग्राह्य धरला जाईल. अर्ज करताना शेतकऱयाला कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. योजनेसाठी त्याची निवड झाल्याकर त्याच्याकडून कागदपत्रे घेतली जातील, असे विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले






