Amalner: अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व माजी सैनिकांचा मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार
अमळनेर ( प्रतिनिधी ) भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी दि ९ अगस्त क्रांती दिवस ते १५ अगस्त पर्यंत अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे, प्रशासन अधिकारी संजय चौधरी व नगरपरिषद कर्मचारी आणि माजी सैनिकांनी आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त शहरात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्या सर्वांचे अमळनेर शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने सुन्नी दारुल कजाचे अध्यक्ष फयाजखा पठाण कुरैशी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सत्कार करण्यात आले.
शहरातील मुस्लिम समाजाचे वरिष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार मास्टर यांच्या मार्गदर्शनानुसार हाजी रफीक तेली,अखलाक शेख ( राॅयल) शब्बीर हाजी सत्तार,फयाज मुबलींग, यांनी जवाबदारी पत्करुन आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने सर्व कार्यक्रम आयोजित केले ज्यांनी ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली अश्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासन अधिकारी,नगरपरिषदेचे विभाग प्रमुख व कर्मचारी आणि तीस माजी सैनिकांचा दिनांक २५ अगस्त रोजी ह्या सर्वांचा सत्कार करण्यात आला सत्कार समारंभाचे उत्तर देताना अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व प्रथम त्यांनी शहरातील मुस्लिम बांधवांच्या मना पासून आभार मानले व आम्ही केलेल्या आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांची दखल कोणीही घेतली नाही परंतु मुस्लिम समाजाने दखल घेऊन आमचे विशेष सत्कार केले तसेच नाशिक विभागातील आयुक्तांनी आपले अमळनेर शहराला प्रथम क्रमांक दिले सर्व समाजाने ह्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाग घेतला होता तसेच आणि मुस्लिम बांधवांच्या कार्य ची प्रशासना केली नंतर माजी सैनिकांनी ही मनोगत व्यक्त केले व सांगितले की देशात आपल्या तालुक्यातील असे हे एकमेव उदाहरणच म्हणावे लागेल ३० माजी सैनिकांचा सत्कार करुन मान सन्मान दिला आणि आमचे कार्यक्रमांची दखल आज पर्यंत कोणी घेतली नव्हती परंतु मुस्लिम समाजाने दखल घेऊन विशेष सत्कार केला कार्यक्रमात सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन फयाज सर आणि जाविद अख्तर सर यांनी केले यावेळी हाजी अब्दुल कादर जनाब, हाजी शेखा मिस्तरी, हाजी शब्बीर पहेलवान, हाजी इकबाल मिस्तरी, हाजी दबीर खा पठाण, हाजी इब्राहिम जनाब, हाजी निसार जनाब, हाजी अब्दुल रज्जाक, हमीद जनाब, मो इकबाल शेख, जहुर मुतव्वली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुख्तार खाटीक, साबिर पठाण,कौसर शेख, समशेर खान पठाण, सैय्यद मुबारक अली, नविद शेख, सैय्यद आबिद अली, इम्रान खाटीक, मसुद मिस्तरी, फारूख सुरभी, इकबाल शेख फोटोग्राफर, अहेमद अली,जमालोदीन शेख,जाविद पेंटर, फिरोज सर, अताउल्ला सर , मुश्ताक सर,नईम सर,मोहीनोदीन सर, जाविद सर,साबिर सर,निहाल सर, इस्माईल सर अन्सारी,साबिर जनाब, सैय्यद शराफत अली, मुस्तफा प्लंबर,कमा प्लंबर, खालीद शरबत, अख्तर अली सैय्यद,सलीम सेठ कुरैशी,हसन खा कुरैशी, अज्जु कुरैशी, मुख्तार कुरैशी, सादिक कुरैशी, सलीम सुभान कुरैशी,जाकिर मिस्तरी, अफरोज मिस्तरी,इबु मिस्तरी, बिस्मिल्ला मिस्तरी, युसुफ पेंटर,रऊफ पठाण,धारचे माजी उपसरपंच अलीम मुजावर,खालीद मिस्तरी, रहेमान मेवाती,अय्युब लोहार,जावेद कुरैशी, अब्दुल रऊफ मुबलीगं अजहर मुबलीग,सगीर मुबलीग, सह आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते






