AmalnerMaharashtra

?️ Breaking News…. कोण करतोय SDO डेस्कला लॉग इन? अमळनेर उपविभागीय अधिकारी यांचे संगणक हॅक की …?

?️ Breaking News….

कोण करतोय SDO डेस्कला लॉग इन? अमळनेर उपविभागीय अधिकारी यांचे संगणक हॅक की …? कुंपणच खातय शेत

जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील का?

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून एकाच व्ही एल ई सेंटर वरून सध्या अनेक दाखले मंजूर केले जात असल्याची चर्चा रंगली आहे.उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात याबद्दल अनेक दिवसांपासून तक्रारीचा सूर निघत होता.उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी दाखले परस्पर SDO डेस्कला लॉग इन करण्यात येत आहेत असे पत्र सर्व अमळनेर, चोपडा येथील व्ही एल ई सेंटरला दिले आहे. या पत्रा द्वारे काही सूचना सेतू सुविधा केंद्रांना देण्यात आल्या आहेत.

परंतु या माध्यमातून प्रश्न असा निर्माण झाला आहे की अमळनेर उपविभागीय अधिकारी यांचे संगणक हॅक करण्यात आले आहे? की पासवर्ड पास झाला आहे?जबाबदार अधिकारी असलेल्या उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांच्याच काळात असे कसे घडले? याअगोदर ही सेतू सुविधा केंद्र अस्तित्वात होते.परस्पर जातीचे दाखले होणे ही अत्यन्त गंभीर आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्वपूर्ण बाब आहे.संबंधित सेतू सुविधा केंद्राची माहिती जर उपविभागीय अधिकारी यांना समजली आहे तर त्यांच्या वर शासकीय प्रणालीत हस्तक्षेप करणे, शासकीय कामात अडथळा आणणे,गैरवापर करणे,फसवणूक करणे,भ्रष्टाचार करणे इ गुन्हे दाखल का केले जात नाही?या अगोदर जे बेकायदेशीर दाखले देण्यात आले त्यांना कोण जबाबदार राहील?ते सर्व दाखले रद्द केले जातील का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button